Ira Khan Nupur Shikhare Wedding : आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरेचं मुंबईत ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने लग्न झालं. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. मुंबईत नोंदणी पद्धतीने लग्न केल्यावर १० जानेवारी रोजी आयरा-नुपूर राजस्थानमधील उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत.

उदयपूरमधील दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये आयराने लग्नासाठी पांढरा शुभ्र गाऊन ड्रेस आणि नुपूरने बेज रंगाचा फॉर्मल सूट परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. दोघेही या वेस्टर्न लूकमध्ये फारच सुंदर दिसत होते. आपली आई रिना दत्ता आणि वडील आमिर खानचा हात धरून लग्नमंडपात एन्ट्री घेतली होती.

हेही वाचा : Video: आयरा खान व नुपूर शिखरे उदयपूरमध्ये अडकले लग्नबंधनात, पहिला व्हिडीओ आला समोर

आयरा-नुपूरची एन्ट्री झाल्यावर उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. लाडक्या लेकीला नववधूच्या पोशाखात पाहून आमिर खान भावुक झाल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. लग्नबंधनात अडकल्यावर दोघांनाचा लिपलॉक करताना फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौघुलेंना चाहत्याकडून मिळालं खास गिफ्ट! अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत म्हणाले…

View this post on Instagram

A post shared by Ethereal Studio (@etherealstudio.in)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयरा-नुपूरच्या लग्नसोहळ्यातील फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. उदयपूरमध्ये लग्नसोहळा पार पडल्यावर आता या दोघांचं पुढचं रिसेप्शन मुंबईतील जियो वर्ल्ड सेंटरमध्ये होईल. या रिसेप्शन पार्टीला बॉलीवूडचे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. येत्या १३ जानेवारीला ही रिसेप्शन पार्टी आमिर खानने आयोजित केली आहे.