आमिर खानची लाडकी लेक आयरा लवकरच तिचा मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. आयरा गेल्या अनेक वर्षांपासून फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेला डेट करत आहे. सध्या या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता सावत्र लेकीच्या लग्नविधींसाठी आमिरची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव होणाऱ्या जावयाच्या घरी पोहोचल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आयरा व नुपूरच्या लग्नाची इंडस्ट्रीत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. २०२२ मध्ये गुपचूप साखरपुडा उरकत या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. ३ जानेवारीला आयरा आणि नुपूर यांचा विवाहसोहळा वांद्रे येथील ताज लँड्स एंडमध्ये पार पडणार आहे. यानंतर दोघेही पाहुण्यांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

हेही वाचा : पंकज त्रिपाठींच्या ‘मैं अटल हूं’ चित्रपटात सोनिया गांधींची भूमिका कोण साकारणार? अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीशी आहे खास कनेक्शन

सध्या आयरा व नुपूर शिखरेच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. आयराची आई रिना व तिची सावत्र आई किरण राव दोघीही लग्नापूर्वीच्या विधीसाठी शिखरे कुटुंबीयांच्या घरी गेल्या होत्या. यावेळी किरण रावने केसात गजरा आणि जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. यादरम्यान, किरण राव विहीणबाईंना घट्ट मिठी मारत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी! लवकरच झळकणार नव्या भूमिकेत, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयरा खान व नुपूर शिखरे २०२० पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी साखरपुडा केला होता. त्यांच्या लग्नाला जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. नुपूर शिखरेबद्दल सांगायचं झालं, तर तो एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर असून अनेक सेलिब्रिटी मंडळींना ट्रेनिंग देतो. इटलीमध्ये झालेल्या ‘आयर्न मॅन- इटली’ स्पर्धेत नुपूर सहभागी झाला होता. याच स्पर्धेदरम्यान त्याने सगळ्यांसमोर आयराला प्रपोज केलं होतं.