आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुपूर शिखरेसोबत तिचा साखरपुडा पार पडला होता. ती आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघे अनेकदा एकमेकांसह क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. आयरा आणि नुपूर दररोज त्यांचे काही फोटो किंवा अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतात.

अलीकडेच आयरा खानने एक पोस्ट केली ज्यामध्ये तिने नूपुरबरोबरच्या काही जुन्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला. यातील पहिल्या व्हिडिओमध्ये आयरा नुपूर शिखरेसह वर्कआउट करताना दिसत आहे. वर्कआउट दरम्यान आयरा नुपूरबरोबर वारंवार लिप-लॉक करताना दिसली आहे आणि यामुळेच ती ट्रोल होत आहे.

आणखी वाचा : काळजाचा ठोका चुकवणाऱ्या, पोटात गोळा आणणाऱ्या या ६ कोरियन वेबसीरिज पहिल्या आहेत का?

आयराचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आहे. एकाने कॉमेंट करत लिहिलं की, “अजून ह्यांचा साखरपुडाच झाला आहे तर ही परिस्थिति आहे, दोघेही ठार वेडे आहेत.” तर एकाने कॉमेंट करत लिहिलं की, “मॅडम थोडीतरी लाज बाळगा.” तर एकाने थेट घरच्यांचे संस्कार काढत दोघांच्या कुटुंबियांनाही ट्रोल केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयरा आणि नुपूर यांचा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये साखरपुडा झाला. ‘ई-टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, आयरा व नुपूर शिखरे लवकरच म्हणजेच ३ जानेवारीला कोर्ट मॅरेज करणार आहे. त्यानंतर ते राजस्थानच्या उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत. लग्नाला फक्त त्यांचे मित्र आणि कुटुंबीयच उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे.