Isha Koppikar was stopped by the police: २००५ मध्ये एकता कपूरचा ‘क्या कूल है हम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण, तरीही या चित्रपटाने मोठी कमाई केली होती. ५ कोटींच्या या चित्रपटाने २३ कोटी कमावले होते.
रितेश देशमुख, तुषार कपूर, नेहा धुपिया आणि ईशा कोप्पीकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला होता. या चित्रपटातून कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. अभिनेत्री ईशा कोप्पीकरलादेखील मोठी लोकप्रियता मिळाली होती.
अभिनेत्री काय म्हणाली?
या चित्रपटात अभिनेत्रीने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ‘क्या कूल है हम’ मध्ये ईशाने एका स्थानिक महाराष्ट्रीय व्यक्तीची भूमिका साकारली होती. जिची बोलीभाषा आणि उच्चार विशिष्ट होते. काही दिवसांपूर्वीच ईशा कोप्पीकरने एक मुलाखत दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरचा एक किस्सा सांगितला.
अभिनेत्री म्हणाली, “मला आठवते एकदा एका पोलिसांनी माझी गाडी थांबवली. मी माझ्या ड्रायव्हरला विचारले, काय झाले? तू सिग्नल तोडलास का? त्याने नकार दिला. खरं तर, त्या पोलिसांना माझी गाडी नंबरवरून माहित होती. त्यांनी मला मुद्दाम थांबवले. गाडी थांबल्यावर त्यांनी मला खिडक्या खाली करायला सांगितल्या. त्यानंतर त्यांनी मला सॅल्यूट केले. त्यांनी माझ्या चित्रपटाचे कौतुक केले. ते म्हणाले की तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची आमच्या पोलीस स्टेशनमध्ये गरज आहे. त्यांचे ते शब्द ऐकून मला खूप बरे वाटले. मी त्यांचे आभार मानले. ”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “मला बऱ्याचदा असे वाटते की माझ्यात एक प्रकारची पोलिस वृत्ती आहे. मी अभिनेत्री झालो नसते तर मी पोलिस अधिकारी झाले असते.”
ईशा असेही म्हणाली की की मला ‘क्या कूल हैं हम’ चित्रपटात काम करताना मजा आली. चित्रपटाची स्क्रीप्ट ऐकल्यानंतरच मला माझे पात्रे खूप आवडले होते. माझे संवाद आणि बोलीभाषा मजेदार होत्या. सेटवर आम्हाला खूप मजा आली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा ‘क्या कूल हैं हम’ हे चित्रपट मला सांगण्यात आले तेव्हा ते मला अश्लील वाटले नाही. तथापि, माझे पात्र खूप स्वच्छ होते. त्यावेळी हॉलिवूडमध्ये ‘मिस कॉन्जेनिअलिटी’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘क्या कूल है हम’ मधील माझी भूमिका कमी-अधिक प्रमाणात तशीच होती. मला माझी भूमिका खूप आवडली. माझा दिग्दर्शक, निर्माता आणि प्रोडक्शन हाऊस सर्व काही चांगले होते. मला कधीही अस्वस्थ वाटले नाही. मला खात्री आहे की तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांनी ही भूमिका स्वीकारण्यापूर्वी त्याबद्दल विचार केला असेल. मी चित्रपटाच्या पहिल्बया भागा बद्दल बोलू शकते. तो छान होता. त्यानंतर, मला माहित नाही.”
दरम्यान, पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर, निर्मात्यांनी२०१२ आणि २०१६ मध्ये चित्रपटाचा दुसरा आणि तिसरा भाग प्रदर्शित केला. तिन्ही चित्रपट वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात अभिनेता तुषार कपूर आणि रितेश देशमुख यांनी भूमिका केल्या होत्या, तर तिसऱ्या चित्रपटात अभिनेता आफताब शिवदासानी तुषारबरोबर महत्वाच्या भूमिकेत दिसला होता.