सध्या इशान खट्टर त्याच्या मिस्ट्री गर्लमुळे चर्चेत आहे. इशान नुकताच पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाला, यावेळी त्याच्याबरोबर त्याची कथित गर्लफ्रेंडही होती. दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे इशान आता त्याचं नातं लवकरच अधिकृत करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. इशान यापूर्वी अनन्या पांडेबरोबर रिलेशनशिपमध्ये होता.

“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”

इशान खट्टर मलेशियन मॉडेल चांदनी बेंझला डेट करत असल्याची चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी ते बऱ्याचदा एकत्र दिसले होते, मात्र पहिल्यांदाच इशानने चांदणीबरोबर असताना पापाराझींना पोज दिल्या. इशान व चांदणी शुक्रवारी रात्री त्यांचा मित्र ओजस देसीच्या एंगेजमेंट पार्टीतून बाहेर पडताना दिसले. दोघेही एकत्र याठिकाणी आले होते.

३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”

यावेळी इशानने चांदणीला पायऱ्या उतरण्यास मदत केली आणि पापाराझीसाठी पोझ देण्यापूर्वी तिला तिच्या कारमध्ये बसवले. या एंगेजमेंट पार्टीमध्ये इशानचा भाऊ शाहिद कपूर, रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे जोडपेही हजर होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इशान खट्टरच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास लवकरच त्याचा ‘पिप्पा’ नावाचा चित्रपट रिलीज होणार आहे. हा १९७१ च्या भारत-पाक युद्धादरम्यानच्या सत्य घटनांनी प्रेरित आहे आणि ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांनी लिहिलेल्या ‘द बर्निंग चाफीज’ या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, प्रियांशू पैन्युली आणि आलिया भट्टची आई सोनी राजदान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.