बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी प्रियांका चोप्रा ही सगळं सोडून हॉलिवूडमध्ये काम करत आहे. नुकतंच तिने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केल्याने ती चर्चेत आली. या राजकारणाला कंटाळूनच तिने हा निर्णय घेतल्याचं तिने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट या शोमध्ये खुलासा केला. यावर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिली.

विवेक अग्निहोत्री, कंगना रणौत, गायक अमाल मलिक यांनीदेखील प्रियांकाच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आता यांच्या पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीने प्रियांकाचं कौतुक केलं आहे. ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून झळकलेली अभिनेत्री मंजरी फडणीस हिने प्रियांका चोप्राच्या हिंमतीला दाद देत यावर भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : अजय देवगण, तब्बूचा ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी

‘नवभारत टाईम्स’शी संवाद साधताना मंजरी म्हणाली, “सगळ्या अडचणींवर मात करत प्रियांका चोप्राने यश प्राप्त केलं याचा मला अभिमान आहे. तिच्या विरोधात लोकांनी इतकी कट कारस्थानं केली तरी ती न डगमगता पुढे चालत राहिली. काळानुरूप ती आणखी कणखर होत आहे. हे सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे, मला नाही वाटत आता कोणतीही गोष्ट प्रियांकाला थांबवू शकेल.”

प्रियांकाने हॉलिवूडमध्ये करिअर करायचा निर्णय का घेतला, याबद्दल ती म्हणाली, “मला बॉलिवूडमध्ये जे काम मिळत होतं, त्यापासून मी खूश नव्हते. मला ‘देसी हिट्स’च्या अंजली आचार्यने एका म्युझिक व्हिडीओमध्ये पाहिल्यावर फोन केला होता. त्यावेळी मी ‘सात खून माफ’ची शूटिंग करत होते. तिने मला अमेरिकेत म्युझिक करिअर करण्यात तुला रस आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर मी बॉलिवूडमधूल काढता पाय घेण्याच्या तयारीत होते ही स्पष्ट केलं.”

आणखी वाचा : प्रियांका चोप्रानंतर बॉलिवूडमधील कंपूशाही आणि राजकारणाबद्दल गायक अमाल मलिकने सोडलं मौन; म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंजरी फडणीस ही नुकतीच ‘मासूम’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरिजमध्ये झळकली होती. यात बोमन इराणीसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत होते. तिला ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटामुळे खरी ओळख मिळाली. याबरोबरच तिने फालतू, ग्रँड मस्ती, कीस कीस को प्यार करूं अशा चित्रपटातही काम केलं आहे.