scorecardresearch

अजय देवगण, तब्बूचा ‘भोला’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; पहिल्या दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी

Bholaa box office prediction : अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे

Bholaa box office prediction
फोटो : इंडियन एक्सप्रेस

Bholaa Box Office Prediction : ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर आता सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या मोस्ट अवेटेड आगामी ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या आहेत. ‘दृश्यम २ ‘च्या सुपर-सक्सेसनंतर, अजय पुन्हा एकदा ‘भोला’मधून मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. अजय देवगणच्या आगामी अ‍ॅक्शन-थ्रिलरबद्दल रिलीजपूर्वी बरीच चर्चा आहे. एवढंच नाही तर भोलाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून मोठी कमाई केली आहे.

अजय देवगणच्या भोलाचं बजेट हे जवळपास १०० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. एकंदरच या चित्रपटासाठी लोकांमध्ये असलेली उत्सुकता आणि यावर घेतलेली मेहनत पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई करेल अशी आशा आहे. काही सिनेतज्ञ आणि मीडिया रीपोर्टनुसार हा चित्रपट पहिल्याच दिवशी १० ते १२ कोटीची कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा : ‘शार्क टँक इंडिया’ फेम अश्नीर ग्रोव्हरच्या वडिलांचे निधन; सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

अजय देवगणच्या चित्रपटासाठी हे सर्वात उत्तम ओपनिंग मानलं जाईल. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनुभव सिन्हाच्या ‘भीड’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करता आलेली नसल्याने आता याच बॉलिवूड चित्रपटाकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ७ लाखांहून अधिक कमाई केली होती. आत्तापर्यंत भोलाची ५० हजाराहूंन अधिक ॲडव्हान्स तिकीट विकली गेली आहेत.

अजय देवगण दिग्दर्शित ‘भोला’ हा २०१९ मध्ये आलेल्या ‘कैथी’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनागराज यांनी केले होते आणि त्यात कार्थी मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे, ‘भोला’च्या कथेबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात एका माणसाची कथा दाखवण्यात आली आहे जो १० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर आपल्या मुलीला भेटतो. परंतु त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. चित्रपटात अजय देवगणशिवाय मकरंद देशपांडे, दीपक डोबरियाल आणि गजराज राव यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 17:11 IST

संबंधित बातम्या