Know About Popular Bollywood Actor: बॉलीवूडचे अनेक असे कलाकार आहेत, ज्यांनी संघर्षाचा मोठा काळ पाहिला. मात्र, कठीण काळावर मात करत त्यांनी यशाला गवसणी घातली. आज आपण अशाच एका बॉलीवूड अभिनेत्याबाबत जाणून घेणार आहोत.
“तिथल्या चाळीतील खोलीतील…”
‘हिरो’, ‘परिंदा’, ‘रंगीला’ अशा चित्रपटांत काम केलेले ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मोठा चाहतावर्ग आहे. आज त्यांच्याकडे खूप संपत्ती आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का? जॅकी श्रॉफ जवळजवळ ३० वर्षे एका चाळीत राहत होते.
रणवीर अलाहाबादियाच्या युट्यूब चॅनेलला जॅकी श्रॉफ यांनी मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी सांगितलेले की मुंबईतील चाळीत राहायचे. ते म्हणालेले, “माझी आई जेवण बनवायची. मी जमिनीवर बसून जेवायचो. जमिनीवर झोपायचो. तिथल्या चाळीतील खोलीतील एका कोपऱ्यात मला एकदा साप दिसला होता. एकदा मला व माझ्या आईला उंदीर चावला होता. तिथल्या आठवणी माझ्या मनात कायम आहेत.मी त्या चाळीत ३३ वर्षे राहिलो, असा खुलासा त्यांनी केला होता.
इतके यश मिळवल्यानंतर आणि आता उत्तम आयु्ष्य जगत असताना जॅकी श्रॉफ यांना आजही ते ज्या ठिकाणी राहायचे, त्या जागेविषयी, त्या घराविषयी आत्मियता वाटत असल्याचे त्यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत सांगितले होते. विकी लालावाणीला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणालेले मी माझे जुने घर परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्या घर मालकाने नकार दिला. सध्या तिथे चार लोक राहतात. मी त्याला म्हणालो की ते जितके भाडे तुला देतात, तितके मी देत जाईन. पण, त्याने नकार दिला.
जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या आयुष्यातील ३३ वर्षे चाळीत काढली असली तरी सध्या ते ऐषोआरामाचे आयुष्य जगत आहे. एबीपीच्या रिपोर्टनुसार, सध्या ते एका सी-फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. या घराची किंमत ३१ कोटी आहे. जॉन अब्राहमच्या आर्किटेक्ट कंपनीने घराचे संपूर्ण डिझाइन केले आहे. GQ नुसार, जॅकी श्रॉफ यांची वैयक्तिक संपत्ती एकूण २१२ कोटी इतकी आहे.
जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी छोट्या भूमिका साकारत करिअरची सुरुवात केली. १९८३ साली त्यांनी स्वामी दादा चित्रपटात छोटी भूमिका साकारली. मात्र, त्याच्या एकाच वर्षानंतर त्यांचे आयुष्य बदलले. सुभाष घई दिग्दर्शित हिरो चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांना अनेक मोठ्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
जॅकी श्रॉफ आजही विविध भूमिका साकारताना दिसतात. हाऊसफुल ५ मध्ये ते नुकतेच दिसले होते. लवकरच ते वेलकम टू द जंगल चित्रपटात दिसले होते.