बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांवरून तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यावरून ती चर्चेचा विषय बनत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहत ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा ‘मिली’ हा चित्रपट नुकताच प्रदर्षित झाला. तेव्हापासून पुन्हा एकदा तिच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

आणखी वाचा : Video: आलिया भट्टला मुलगी झाल्याचे कळताच राखी सावंतने वाटली मिठाई, म्हणाली…

जान्हवी काही महिन्यांपूर्वी ओरहान अवत्रमणीला डेट करत असल्याचे बोलले जात होते. ती दोघे अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे अशा चर्चा रंगल्या होत्या. पण काही काळाने त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले होते. पण आता ती दोघं पुन्हा एकत्र दिसल्याने त्यांचं पॅचअप झालं असून ती दोघं एकमेकांना डेट करत आहेत असं म्हटलं जात आहे. अखेर जान्हवीने याबाबत मौन सोडलं आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जान्हवीने ओरहानबद्दल तिला काय वाटतं हे स्पष्ट केलं. ती म्हणाली, ‘मी ओरीला अनेक वर्षांपासून ओळखते. तो माझा भक्कम आधार आहे. त्याने नेहमीच माझी साथ दिली आहे. तो जेव्हा सोबत असतो, तेव्हा मला खूप कम्फर्टेबल वाटतं. मी त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेऊ शकते असा तो आहे. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. असा मित्र मिळणं हे खरोखर माझं भाग्य आहे. आम्ही एकत्र असताना खूप मजा करतो. तो माझा खूप चांगला मित्र आहे.”

हेही वाचा : जान्हवी आणि खुशी कपूर करत होत्या एकाच व्यक्तीला डेट? अभिनेत्री म्हणाली, “तो आमचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युरोपमध्ये ‘बवाल’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जान्हवीसोबत दिसला होता. याशिवाय तो नुकताच ‘मिली’ चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यानही तिच्यासोबत होता. दुसरीकडे, फक्त जान्हवीच नाही तर सारा अलीखान, अनन्या पांडे, शनाया कपूर, इब्राहिम खान, न्यासा यांचाही तो खूप चांगला मित्र आहे.