सध्या जान्हवी कपूर तिच्या ‘मिली’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये जान्हवीने ‘मिली नौटियाल’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे. नर्सिंगचे प्रशिक्षण घेणारी मिली चुकून एका फ्रिजिंग रुममध्ये अडकते. तेव्हा तिच्या जवळच्यांना ती या ठिकाणी अडकल्याची माहिती नसल्यामुळे ते तिला बाहेर शोधत असतात. त्या फ्रिजिंग रुममध्ये हळूहळू तापमान कमी होत जाते आणि त्याचा परिणाम मिलीच्या शरीरावर होतो. या संकटामधून बाहेर पडण्यासाठी मिलीने केलेला संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहेत. जान्हवीसह सनी कौशल, मनोज पाहवा आणि संजय सुरी यांनी काम केले आहे. मथुकुट्टी झेवियर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

जान्हवी कपूर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर सतत काही ना काही पोस्ट करत असते. नुकतेच तिने ‘मिली’ चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिने या भूमिकेसाठी किती मेहनत घेतली आहे हे दिसून येते. एका फोटोमध्ये जान्हवीच्या अंगाभोवती प्लास्टिक गुंडाळले असल्याचे पाहायला मिळते. या पोस्टमधला पहिला फोटो जान्हवी आणि दिग्दर्शक मथुकुट्टी झेवियर यांचा आहे. चित्रपटामध्ये खरेखुरे हावभाव यावेत यासाठी विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – “मंदिरांचा जीर्णोद्धार करून…”; दाक्षिणात्य अभिनेत्याचे पंतप्रधान मोदींबद्दलचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

“काही हिरे, काही आठवणी, बरेचसे अश्रू आणि भावनांनी भरलेलं हृदय, एका दिवसात मिली तुमच्या भेटीला येत आहे” असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. या पोस्टखाली तिच्या कथित बॉयफ्रेंडने अक्षत राजनने कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. कमेंट बॉक्समध्ये त्याने “तु या चित्रपटामध्ये खूप छान काम केलं आहेस”, असे लिहिले आहे. त्यानंतर त्याच्या या कमेंटला जान्हवीच्या चाहत्यांनी लाईक केले आहे. काहींनी त्यावर कमेंट देखील केले आहे.

आणखी वाचा – सुश्मिता सेनची भाऊ-वहिनीच्या वादावर पहिली प्रतिक्रिया; चारूला सल्ला देत म्हणाली, “त्याच्याबरोबर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यापूर्वी जान्हवीचा ‘गुडलक जेरी’ हा चित्रपट हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. पुढच्या वर्षी तिचे ‘बवाल’ आणि ‘मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही’ असे चित्रपट प्रदर्शित होणार आहे.