Javed Akhtar and Shabana Azmi wedding: ज्येष्ठ लेखक व गीतरचनाकार जावेद अख्तर हे कायमच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. जावेद अख्तर व शबाना आझमी हे बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपे आहे.

आता अन्नू कपूर यांनी जावेद अख्तर व शबाना आझमी यांच्या लग्नाबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, त्यांचे लग्न १९८४ साली डिसेंबरमध्ये मध्यरात्री झाले होते. अन्नू मलिक यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, जावेद अख्तर व शबाना आझमी यांचे लग्न मी लावून दिले, असे वक्तव्य केले.

“एक तर ब्रेकअप करा किंवा…”

टीव्ही ९ भारतवर्षला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “तुम्ही असे म्हणू शकता की, मी त्यांचे लग्न लावून दिले. माझे त्यांच्या कुटुंबाबरोबर चांगले संबंध होते. त्यांच्या नात्यात असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, मी त्यांना निर्णय घेण्याचा सल्ला दिला, “एक तर ब्रेकअप करा किंवा लग्न करण्याचा निर्णय घ्या.” तेव्हा ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’ला समाजात मान्यता नव्हती. माझे बोलणे ऐकल्यानंतर जावेद अख्तर म्हणालेले की, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा. शबाना यांना मी बहीण मानत होतो. त्यानंतर मी वांद्रे मशिदीत एका मौलवीला बोलावण्यासाठी गेलो. त्यानंतर मध्यरात्री त्यांचे लग्न लावले”, अशी आठवण अन्नू मलिक यांनी सांगितली.

एएनआयला दिलेल्या जुन्या मुलाखतीत, अन्नू कपूर यांनी जावेद अख्तर व शबाना आझमी यांच्या लग्नाच्या दिवसाची आठवण सांगितली होती. ते म्हणालेले, “जेव्हा जावेद अख्तर यांनी शबाना आझमींबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते दारुच्या नशेत होते. ते दारूच्या नशेत एका ठिकाणी बसले होते. शबाना दुसऱ्या ठिकाणी पुस्तक वाचण्यात मग्न होती. मी शबानाला सांगितले की, तुमच्या नात्याबद्दल निर्णय घ्या. शबाना म्हणाल्या की, मी कसा निर्णय घेऊ? ते कोणताही निर्णय घेण्यास तयार नाहीत. मी जावेद अख्तर यांना समजावले.

“ते गोंधळलेल्या स्थितीत होते. ते म्हणाले की हो, मी लग्न करण्यास तयार आहे. मी अनिल कपूर आणि बोनी कपूर यांना फोन केला आणि सर्व जण तिथे आले. ते पहाटे ४ वाजेपर्यंत नाचत होते. लग्न मध्यरात्रीनंतर झाले.” अन्नू कपूर यांनी जावेद अख्तर व शबाना आझमी यांच्या लग्नाची अशी आठवण सांगितली होती.

जावेद अख्तर यांना दारूचे व्यसन लागले होते. ते दिवसदिवसभर दारु पित असत. याबद्दल शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी वक्तव्य केले होते. जावेद अख्तर यांचे शबाना आझमी यांच्याबरोबरचे दुसरे लग्न होते, त्यांना दोन मुले होती. त्याबद्दल शबाना आझमी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणालेल्या की, तो काळ खूप कठीण होता. त्यामध्ये असलेल्या तीन व्यक्ती काय सहन करतात, हे कोणालाही समजू शकत नाही. तो वेदनादायी काळ असतो, विशेषत: जेव्हा मुले असतात. तेव्हा खूप कठीण काळातून जावे लागते, असे म्हणत शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांचे कौतुक केले होते.