बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अभिनयाबरोबर एनर्जेटिक डान्समुळे नेहमी चर्चेत असतो. त्याच्या एनर्जीचं कायम कौतुक केलं जात. पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; ज्यामध्ये रणवीरपेक्षा ‘जवान’ चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली एनर्जेटिक डान्स करताना दिसत आहे.

रणवीर सिंह व अ‍ॅटलीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांची मुलगी ऐश्वर्या हिच्या रिसेप्शन सोहळ्यातला हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये अ‍ॅटलीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: “चला जाऊ शुटिंगला”, निखिल बनेने भांडूप ते ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटपर्यंतचा दाखवला प्रवास, व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओत, सुरुवातीला रणवीर अ‍ॅटलीला डान्स करण्यासाठी तयार करताना दिसत आहे. त्यानंतर अ‍ॅटली जो काही भन्नाट डान्स करू लागतो रणवीर त्याच्याकडे पाहतच राहतो. मग दोघं एकत्र मिळून जबरदस्त डान्स करायला लागतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – “हे राम, वाचव आमचे कान…”, अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणवीर व अ‍ॅटलीच्या या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसेच नेटकऱ्यांनी देखील भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.