Jaya Bachchan and Amitabh Bachchan: बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल करत असल्याचे पाहायला मिळते. बिग बी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी नुकतीच त्यांच्या लग्नाचा ५२ वा वाढदिवस साजरा केला.

अमिताभ बच्चन यांनी या निमित्ताने एक्स या प्लॅटफॉर्मवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो त्यांच्या लग्नातील आहेत. या फोटोमध्ये पाहायला मिळते की जया बच्चन यांनी लाल रंगाची साडी नेसली आहे. तर अमिताभ बच्चन पांढऱ्या रंगाच्या कुर्ता-पायजमामध्ये दिसत आहेत. ते दोघे लग्नाचे विधी करत असल्याचे दिसते. हे विधी करताना ते एकमेकांशी बोलत असल्याचेदेखील दिसते. हे फोटो शेअर करताना बिग बींनी चाहत्यांचे आभार मानले.

“आमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी मला व जयाला शुभेच्छा दिल्या. त्यांचे मनापासून आभार. त्यांच्याप्रति मनात कृतज्ञता व प्रेम आहे.” वेळेचं चक्र हे फिरत राहतं अशा आशयाचं वाक्यदेखील लिहिले. हे वाक्य अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे आहे.

जया बच्चन व अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. जंजीर, शोले, चुपके चुपके, मिली अशा अनेक चित्रपटांत त्यांनी एकत्र काम केले आहे. जया बच्चन व अमिताभ बच्चन यांची गुड्डी चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेट झाली होती. एका जुन्या मुलाखतीत जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल वक्तव्य केले होते.

जया बच्चन म्हणालेल्या, “‘गुड्डी’ चित्रपटाच्या सेटवर माझी अमिताभ बच्चन यांच्याशी ओळख करुन देण्यात आली. त्यांना भेटल्यानंतर त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला. प्रसिद्ध लेखक हरिवंशराय बच्चन त्यांचे वडील असल्याने मला थोडेसे आश्चर्यही वाटले होते. त्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१९७२ साली प्रदर्शित झालेल्या एक नझर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जया बच्चन व अमिताभ बच्चन एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी काही काळ डेट केले. १९७३ ला त्यांनी लग्न केले. जया बच्चन यांचे वडील पत्रकार तरुण कुमार भादुरी यांनी जया व अमिताभ बच्चन यांच्या आंतरजातीय विवाहात काय अडचणी आल्या होत्या, यावर लेख देखील लिहिला होता. बंगालमधील पुजाऱ्यांनी त्यांच्या विवाहाला विरोध केला होता, अशी आठवण त्यांनी लिहिली होती.

दरम्यान, जया बच्चन अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्या अनेकदा पापाराझींवर भडकताना दिसतात. अमिताभ बच्चन हे आजही चित्रपटात महत्वाच्या भूमिकांत दिसतात. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.