मीडियाशी संवाद असो किंवा एखाद्या गोष्टीवर राज्य सभेत मत मांडणं असो, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखल्या जातात. फिल्मी करिअरमधून ब्रेक घेतल्यानंतर जया बच्चन या राजकारणात सक्रिय झाल्या. समाजवादी पार्टीच्या खासदार म्हणून जया बच्चन त्यांचं कर्तव्य अगदी चोखपणे बजावतात व राज्य सभेत त्या नेहमीच प्रश्न विचारण्यात पुढे असतात.

जया बच्चन यांच्या चिडक्या स्वभावाचा अनुभव बऱ्याचदा लोकांना आला आहे. आता नुकतंच राज्य सभेतील जया बच्चन यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात त्या सभापतींवरच चिडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. राज्यसभेत प्रश्नोत्तरांचं सेशन सुरू असताना एका प्रश्नाच्या वेळी विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. दरम्यान सभापती यांनाही बोलू न दिल्याने जया बच्चन चांगल्याच खवळल्या. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : पुन्हा बदलली सीतेची भूमिका करणारी अभिनेत्री? रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट समोर

उपसभापती हरिवंश नारायण सिंग यांनी प्रश्न क्रमांक १७ नंतर पुढील १८ व्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले अन् थेट १९ व्या प्रश्नावर चर्चा करायला सुरुवात केली. यावर जया बच्चन चांगल्याच संतापल्या व त्या बोलत असताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यांना हाताचा इशारा करून खाली बसण्यास सांगितले. यावर जया बच्चन आणखीनच चिडल्या व त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याजवळ याबद्दल नाराजी व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जया बच्चन म्हणाल्या, “जर सभापती व उपसभापती यांनी आम्हाला बसायला सांगितलं तर आम्ही खाली बसू, पण इतर सदस्य जर हाताचे इशारे करून आम्हाला बसायला सांगत असतील तर त्यांचं आम्ही ऐकणार नाही. तुम्ही एखादा मुद्दा नीट मांडला तर ठिके, पण आम्हाला तो नीट समजलाच नसेल तर आम्ही त्यावर प्रश्न विचारणारच. आम्ही काही शाळेतील विद्यार्थी नाही बस म्हंटलं की बसायला. आम्हालाही योग्य तो आदर मिळायला हवा.” जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.