Jaya Bachchan Mother Health Updates : ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांना प्रकृतीच्या कारणास्तव भोपाळ येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘बिग बीं’च्या सासूबाई ९४ वर्षांच्या आहेत. जया बच्चन व अभिषेक बच्चन तातडीने भोपाळला रवाना झाल्याने इंदिरा भादुरी यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, ‘फ्री प्रेस जनरल’ला भादुरी यांचे जावई राजीव वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्या रुग्णालयात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जया बच्चन यांच्या आईचं निधन झाल्याच्या अफवा उडाल्या होत्या. मात्र, या सगळ्यावर त्यांच्या जावयांनी स्पष्टीकरण दिलं आहे. इंदिरा भादुरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जावई राजीव वर्मा यांनी दिली आहे. तसंच याबाबत दुजोरा इंदिरा भादुरी यांच्या केअर टेकरने देखील दिला आहे. केअर टेकरच्या माहितीनुसार, “भादुरी यांच्या मणक्याला फ्रॅक्चर झालं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण, त्यांची प्रकृती ठीक आहे. त्या आमच्याशी नीट संवाद साधत असून जेवत देखील आहे.”

माहितीनुसार, इंदिरा भादुरी यांनी हृदयविकाराचा त्रास होता. त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास समस्या निर्माण होत होती. म्हणून त्या बऱ्याच दिवसांपासून वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. मंगळवारी रात्री नातू, अभिनेता अभिषेक बच्चन आजीला भेटण्यासाठी भोपाळला गेला होता. त्यामुळेच निधन झाल्यांच्या वावड्या उठल्या. पण, तसं काहीही झालं नसून त्या सुखरुप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंदिरा भादुरी या भोपाळमधील श्यामला हिल्स येथे राहतात. त्यांचे पती तरुण भादुरी पत्रकार आणि लेखक होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध दैनिकांमध्ये काम केलं आहे. १९९६ मध्ये तरुण भादुरी यांचं निधन झालं.