Kajol and Jaya Bachchan: ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

अनेकदा पापाराझी फोटो काढताना त्यांनी केलेल्या कमेंट्स, तसेच चाहते फोटो काढण्यासाठी आल्यानंतर त्या अनेकदा त्यांना ओरडतात, त्यामुळे जया बच्चन यांचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसते.

अनेकदा नेटकरी जया बच्चन या सतत रागावलेल्या, चिडलेल्या का असतात, अशा कमेंट करतात. तर त्यांच्या वागण्यासाठी अनेकदा त्यांना ट्रोलदेखील करतात. अशातच जया बच्चन यांचा एक हसलेला फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जया बच्चन या काजोल व राणी मुखर्जी यांच्या दुर्गा पूजेत सहभागी झाल्या होत्या. राणी व काजोल दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात, मोठ्या उत्साहाने दुर्गा पूजेचे आयोजन करतात. अनेक सेलिब्रिटी सहभागी होत देवीचा आशीर्वाद घेतात. जया बच्चन यांनीदेखील हजेरी लावली होती.

काजोलने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये काजोल व जया बच्चन दोघींच्या चेहऱ्यावर गोड हसू दिसत आहे. दोघीही पारंपारिक वेशभूषेत सुंदर दिसत आहेत. आता जया बच्चन यांना हसताना पाहून अनेकांनी सोशल मीडियावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स लक्ष वेधून घेत आहेत.

नेटकरी काय म्हणाले?

एका नेटकऱ्याने लिहिले, “जयाजी हसत आहेत. म्हणजे हे एआयने केलेले आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “फक्त काजोलच जयाजींना हसवू शकते”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “हे हसणारे चेहरे खूप सुंदर दिसत आहेत”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी राणी आणि काजोल यांचे कौतुक केले आहेत. तर काहींनी अजय या पूजेला कधीच का येत नाही, तो कधीच का या दुर्गा पूजेत सहभागी होत नाही? अशा कमेंट करत त्यांना प्रश्न विचारले आहेत.

काजोलच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या टू मच विथ काजोल अँड ट्विंकल या शोमध्ये दिसत आहे.