Jaya Prada Birthday: अभिनेत्री व राजकीय नेत्या जया प्रदा यांचा आज ६१ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जया प्रदा या त्यांच्या उत्तम अभिनयाबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिल्या होत्या. अशातच त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

Indian Idol 13: ऋषी सिंह ठरला ‘इंडियन आयडला १३’चा विजेता, दत्तक लेकाने उंचावली आई-वडिलांची मान

३ एप्रिल १९६२ रोजी आंध्र प्रदेशमध्ये जन्मलेल्या जयाप्रदा यांचं खरं नाव ललिता राणी होतं. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यावर स्वतःचं नाव बदलून जया प्रदा ठेवले. त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षीच सिनेजगतात पाऊल ठेवले होते. चित्रपटांमध्ये काम करून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली, पण त्यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र खूप अडचणींनी भरलेलं होतं.

सात वर्षांनी लहान तरुणाशी लग्न अन् घटस्फोट; ११ वर्षांनी वाईट अनुभव सांगत मनिषा कोईराला म्हणाली, “सहा महिन्यांत माझा पती…”

जया यांनी करिअरमध्ये जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं. करिअरच्या शिखरावर असताना त्यांचं नाव चित्रपट निर्माते श्रीकांत नाहटा यांच्याशी जोडलं गेले. मात्र, दोघांनीही या नात्याला नेहमीच मैत्रीचे नाव दिले. अखेर १९८६ मध्ये त्यांनी श्रीकांत नाहटाशी लग्न केले. त्यावेळी नाहटा विवाहित होते आणि त्यांना तीन मुलं होती. जयाशी लग्न केल्यावरही त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे जया यांना श्रीकांत यांच्या घरी राहताही आलं नाही. त्यांना पत्नीचा दर्जा व मान मिळाला नाही. या लग्नाचा जया यांच्या करिअरवरही परिणाम झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जया प्रदाशी लग्न केल्यानंतरही श्रीकांत नाहटा यांनी पहिल्या पत्नीला सोडलं नाही. तसेच त्यांनी जयापासून मुलही होऊ दिलं नाही. त्यामुळे त्यांच्या नात्यात कटुता येऊ लागली आणि हळूहळू दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर जया यांनी आपल्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं होतं. त्या आता दत्तक मुलाबरोबर राहतात.