शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘पठाण’ हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट सामील आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. परंतु हा ट्रेलर पाहून अभिनेता जॉन अब्राहम नाखुश असल्याचे दिसत आहे.

या चित्रपटात शाहरुख खान बरोबर दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. शाहरुख प्रमाणेच जॉन अब्राहम याच्याही लूकला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले त्यांचे ॲक्शन सीन्स प्रेक्षकांना आवडले. मात्र अभिनेता जॉन अब्राहमच्या मनात काहीतरी वेगळंच असल्याचं जाणवत आहे.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

आणखी वाचा : शाहरुख खानच्या दुबईतील चाहत्यांसाठी खास ट्रीट, ‘पठाण’चा ट्रेलर झळकणार बुर्ज खलिफावर

‘पठाण’च्या ट्रेलर प्रदर्शनानंतर जॉन अब्राहमने इंस्टाग्राम स्टोरीवर हा ट्रेलर शेअर केला आणि त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघण्याचं आवाहन केलं. परंतु शाहरुख आणि जॉनमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. जॉन नुकताच एका कार्यक्रमात सहभागी झाला होता तेव्हा त्याला पठाण चित्रपट आणि शाहरुखबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. मात्र जॉनने त्या प्रश्नाचे उत्तर देणं टाळलं आणि तो तिथून निघून गेला. त्यामुळे जॉन शाहरुखवर नाराज आहे असं बोललं जात आहे.

हेही वाचा : जॉन अब्राहम दिसणार नव्या भूमिकेत, केली आगामी चित्रपटाची घोषणा

दरम्यान ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातून शाहरुख चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याने त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर या चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. त्यामुळे ‘पठाण’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी झाला झाला आहे.