Kajol celebrates her birthday with Ajay Devgns onscreen kids: बॉलीवूड अभिनेत्री काजोल काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. अभिनेत्री नुकतीच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हजर राहिली होती.या सोहळ्यात काजोलला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला आहे.
या सोहळ्यात अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या. मराठी बोलत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात ती तिच्या आईसह हजर होती. विशेष बाब म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात तिने तिच्या आईची साडी नेसली होती.
काजोलने अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलांबरोबर साजरा केला वाढदिवस
त्याबरोबरच अभिनेत्रीने ५ ऑगस्टला तिचा ५१ वा वाढदिवसदेखील साजरा केला. अभिनेत्री इशिता दत्ताने शेअर केलेल्या फोटोंमुळे सध्या चर्चेत आली आहे. इशिता दत्ताने पती वत्सल सेठ आणि काजोल यांचे काही फोटो शेअर केले आहेत. काही वर्षांपासून काजोल आणि वत्सल एकत्र वाढदिवस साजरा करीत असल्याचे पाहायला मिळते.
इशिताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये काजोलने लाल रंगाचा ड्रेस घातल्याचे पाहायला मिळाले; तर वत्सलने डेनिमचा शर्ट घातला होता. मंगळवारी इशिताने काही फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करताना माझ्या आवडत्या लोकांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, असे तिने लिहिले.
पहिल्या फोटोंमध्ये वत्सल व काजोल हे त्यांच्यासमोर असलेल्या केककडे पाहत असल्याचे दिसत आहे. तसेच, केककडे पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंददेखील असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये काजोलचा मुलगा युगदेखील दिसत आहे; तर इशिता काही फोटोंमध्ये वत्सल आणि काजोलबरोबर फोटोंसाठी पोज देताना दिसत आहे.
इशिताने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. बॉबी देओलसह काही कलाकारांनी अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या. तर, काही चाहत्यांनी काजोल आणि वत्सल व इशिता यांचे नाते काय, अशाही कमेंट्स केल्या आहेत.


वत्सल सेठ आणि इशिता दत्ता हे दोघेही अभिनेता अजय देवगणचे सहकलाकार आहेत. २००४ च्या ”टार्झन: द वंडर कार” या चित्रपटात वत्सल सेठने अजयच्या मुलाची भूमिका केली होती; तर इशिता ‘दृश्यम’च्या दोन्ही भागांमध्ये त्याच्या मुलीची भूमिका करीत होती. तेव्हापासून या जोडप्याचे अजय व काजोल यांच्याबरोबर उत्तम नाते असल्याचे पाहायला मिळते. काही सणांमध्येदेखील ते अजयच्या कुटुंबाबरोबर दिसतात.
काजोलने वत्सलच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या होत्या. तिने सोशल मीडियावर लिहिले होते, वाढदिवसाच्या शुभेच्छा वत्सल. मला माहीत आहे की, हे वर्ष तुझ्यासाठी खूप खास आहे. तुझ्या ज्या काही इच्छा आहेत, त्या आताच पूर्ण होऊ दे.” तर अजय देवगणने लिहिले होते की, तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा तेव्हा जांभळ्या रंगाची कार शोध. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दरम्यान, अजय देवगण सध्या सन ऑफ सरदार २ या चित्रपटामुळे मोठ्या चर्चेत आहे.