सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आता कलाकारांसाठी सोपं झालं आहे. सतत व्हिडीओ, फोटो, पोस्ट शेअर करणं कलाकारांना आवडतं. काही कलाकार मंडळी तर आपल्या खासगी आयुष्याबाबतही सोशल मीडियाद्वारे खुलेपणाने बोलताना दिसतात. पण अलिकडे सोशल मीडियापासून काही काळ ब्रेक घेणं हा नवा ट्रेंड कलाकारांमध्ये सुरु झाला आहे. आता काजोल देवगणनेही सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टद्वारे तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं आहे. पण यामागचं कारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियापासून ब्रेक का घेत आहे हे तिने पोस्ट शेअर करत चाहत्यांना सांगितलं. तिच्या या पोस्टनंतर चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत. आणखी वाचा - भाड्याच्या घरात राहतो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेता, घरभाडं किती? हेही सांगितलं अन्… तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये काजोलने म्हटलं की, "मी माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळामधून जात आहे". या फोटोला तिने एक कॅप्शन दिलं आहे. "मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे" असं हे कॅप्शन आहे. पण काजोलच्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडलं? हे तिने सांगणं टाळलं आहे. आणखी वाचा - चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…” https://www.instagram.com/p/CtQnXowNPk6/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== इतकंच नव्हे तर काजोलने तिच्या इतर सगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या आहेत. तिच्या या निर्णयानंतर चाहतेही चिंता व्यक्त करत आहेत. अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून काजोलला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तू तुझी काळजी घे. तसेच तुला पाहिजे तेवढा वेळ स्वतःसाठी खर्च कर, काजोल नक्की काय झालं? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.