बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे सर्व फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसतात. अनेकदा तिला तिच्या फोटोंमुळे, तिने केलेल्या पोस्ट्समुळे ट्रोल केलं जातं. आता एका कार्यक्रमात काजोलने लेकीच्या लोकप्रियतेवर प्रतिक्रिया दिली आहे.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
न्यासाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाते नेहमीच उत्सुक असतात. ती देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही असं अजय आणि काजोलने त्यांच्या दोन्हीही मुलांना सांगितलं आहे. तर बॉलिवूडमध्ये येण्याच्या आधीच न्यासाची लोकप्रियता पाहून काजोल खुश आहे.
नुकतीच तिने एक मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली, “मला तिची एक गोष्ट खुप आवडते ती म्हणजे न्यासा कुठेही गेली तरी ती आत्मविश्वासाने स्वत:ला सिद्ध करते. मला तिचा अभिमान वाटतो यात अजिबात शंका नाही. ती १९ वर्षांची आहे आणि तिचं पूर्ण आयुष्य दिलखुलासपणे जगत आहे. तिला जे करायचं आहे ते करण्याचा तिला अधिकार आहे आणि ते ती करू शकते. मी तिला नेहमीच त्यासाठी पाठिंबा देईन.”
आता तिचं हे बोलणं खूप खूप चर्चेत आलं आहे. तर न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.