Kajol got Angry at Durga Puja Pandal : भारतात आज काही ठिकाणी अष्टमी आणि काही ठिकाणी नवमी दोन्हीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही बॉलीवूड सेलिब्रिटी मुंबईत दुर्गापूजा करत आहेत. अभिनेत्री काजोल, तनिषा मुखर्जी आणि आलिया भट्ट यांचे दुर्गापूजा करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडीओत काजल प्रचंड संतापलेली दिसत आहे.

दुर्गा पूजेसाठी काजोलने गुलाबी आणि जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तसेच त्याबरोबर तिने सोन्याचा नेकलेस आणि कानातले घातले होते. काजोलने साधा मेकअप केला होता. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र, मंडपातमध्ये पूजेसाठी आलेल्या काजोलला एका गोष्टीमुळे खूप राग आला, नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.

हेही वाचा – शो ७० दिवसांत का संपवला? आर्या जाधवला घराबाहेर काढण्याचा निर्णय योग्य होता का? केदार शिंदे म्हणाले, “आम्ही ३ दिवस…”

काही लोक पूजेदरम्यान दुर्गा देवीच्या मूर्तीच्या बाजूला शूज घालून उभे होते, हे पाहून काजोलला राग आला आणि तिने त्यांना शूज काढण्यास सांगितलं. त्यानंतर तिने माईक हातात घेऊन मंडपात येताना शूज बाहेर काढा अशी सूचना दिली. तसेच पूजा सुरू असल्याने देवीचा आदर करा असंही ती म्हणाली. काजोलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – ४२ वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने गुपचूप केलं दुसरं लग्न, साधेपणाने पार पडला विवाह; फोटो आले समोर

काजोलचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिने केलेल्या कृतीचं समर्थन केलं आहे. देवी असलेल्या मंडपामध्ये शूज घालून जाणं चुकीचं आहे, त्यामुळे तिने जे केलं तो बरोबर आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच काहींनी काजोलने लोकांना शांतपणे सांगायला हवं होतं, असं म्हटलं आहे. फिल्मिज्ञानने काजोलचे हे व्हिडीओ शेअर केले आहेत.

kajol video comments 1
काजोलच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
kajol video comments
काजोलच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)
View this post on Instagram

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल जेव्हा पूजेला शूज घालून आलेल्यांवर ओरडत होती, तेव्हा आलिया भट्ट तनिषा मुखर्जीच्या शेजारी उभी होती. ती तिची बहीण शाहीन भट्टसोबत दुर्गा मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी आली होती. लाल साडीत आलिया खूपच सुंदर दिसत होती.