बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण ही कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असल्याचे पाहायला मिळत. ती अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तिचे हे सर्व फोटो चर्चेचा विषय ठरताना दिसतात. काही दिवसांपूर्वी न्यासा देवगणने एका दिवाळीच्या पार्टीला हजेरी लावली होती. यावेळी तिचा लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले होते. तिने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केल्याची कमेंट काहींनी केली होती. मात्र आता न्यासाची आई काजोलने मौन सोडले आहे.

अभिनेत्री काजोल ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काजोलची मुलगी न्यासा ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी न्यासाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात तिला ओळखणंही अनेकांसाठी कठीण झालं होतं. न्यासाचा हा लूक पाहून तिने तिच्या चेहऱ्याची सर्जरी केल्याचं अनेक युजर्सचं म्हणणं आहे. तर न्यासाने नाकावर शस्त्रक्रिया केल्याचंही काहींनी म्हटलं आहे. अनेकांनी तर न्यासा जान्हवीसारखी का दिसतेय, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे का? असा सवालही उपस्थित केला होता. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान काजोलने या सर्व प्रश्नांवर उत्तर दिले.
आणखी वाचा : लॉकडाऊनमधील प्रेम ते लिव्ह-इन रिलेशन, आमिर खानच्या लेकीची हटके लव्हस्टोरी, जाणून घ्या त्याच्या मराठमोळ्या जावयाबद्दल….

‘डीएनए इंडिया’ने वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काजोलच्या मते न्यासा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. त्यामुळे तिला सौंदर्य आणि आरोग्याविषयी खूप माहिती आहे. न्यासा दर आठवड्यातून तीन वेळा फेस मास्क लावते. विशेष म्हणजे ती तिच्या मैत्रिणींनाही तो लावण्याचा सल्ला देते. मला आणि अजयलाही ते लावण्यास सांगते.

न्यासा ही तिचे वडील अजय देवगणसारखी फिटनेस फ्रीक आहे. ती जिम करत नाही. पण ती योगावर लक्ष केंद्रित करते. याबरोबरच ती सकाळी उठून रिकाम्या पोटी २ ते ३ ग्लास कोमट पाणी पिते. याबरोबरच ती दलिया, फळे आणि उकडलेले अंडेही खाते. दुपारच्या जेवणात न्यासा ही उकडलेल्या भाज्या, शेंगा, कोशिंबीर आणि चपाती खायला आवडते. याशिवाय ती रात्रीच्या जेवणातही डाळ-चपाती, भाज्या आणि कोशिंबीर खाते. त्यामुळे ती फिट आहे, असे काजोलने म्हटले.

आणखी वाचा : “चेहऱ्याची सर्जरी केलीस का?” दिवाळी पार्टीत अजय देवगणच्या मुलीला पाहून नेटकऱ्यांचा सवाल

न्यासा ही लोकप्रिय स्टार किड्समध्ये गणली जाते. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नुकतंच तिने तिचा १९ वा वाढदिवस साजरा केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.