९०च्या दशकात अभिनय व लाघवी सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल तिच्या बिनधास्त आणि बेधडक अंदाजासाठी ओळखली जाते. यावरुन अनेकदा काजोलला ट्रोलही केलं जातं. काजोलने नुकतच तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत. काजोलने या पोस्टद्वारे तिचा राग व्यक्त केला आहे. मात्र, या पोस्ट नेमक्या कोणासाठी आहेत याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे.

हेही वाचा- “माझ्या मुलीला शिवीगाळ करणारे..” सोशल मीडिया युजर्सवर भडकले सुनील शेट्टी

काजोलने पहिल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे‘ जे लोक त्यांच्या डोळ्यांनी प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘गुडबाय’ हा शब्द असतो. पण जे त्यांच्या हृदयाने आणि मनाने प्रेम करतात, त्यांच्यासाठी ‘विभक्त’ नावाची कोणतीच गोष्ट नसते- रुमी’,

हेही वाचा- आली रे आली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली; लवकरच शूटिंगला होणार सुरुवात

काजोलच्या या दुसऱ्या पोस्टची सुरुवातच #truthoftheday आजच्या दिवसाचं सत्य या हॅशटॅगने केली आहे. पुढे तिने लिहिलंय, ‘स्त्री असो किंवा पुरुष.. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भित्रेपणा असतो. (शिवीचा वापर) त्यांची किंमत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या लिंगापुढे आंधळे होऊ नये हीच खरी युक्ती आहे.’ या पोस्टच्या अखेरीस तिने #thishithome असा हॅशटॅग वापरला आहे. काजोलने तिच्या या पोस्टमधून कोणावर निशाणा साधला आहे याबाबत चाहते अद्याप संभ्रामात आहेत

काजोल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्टबाबत ती पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. अनेकदा काजोल कुटुंबीयांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी काजोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन लेक न्यासाचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये न्यासाने डीप नेक गाऊन परिधान करत ग्लॅमरस लूक केल्याचं पाहायला मिळाल होतं. काजोलच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर काजोल शेवटची ‘सलाम वेंकी’ चित्रपटात दिसली होती. येत्या काही दिवसांत ती इब्राहिम अली खानच्या डेब्यू चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही.