KGF स्टार यश साकारणार 'रावणा'ची भूमिका; बॉलिवूडच्या 'या' दिग्गज अभिनेत्याला केलं रिप्लेस spg 93 | kanada star yash will be seen as raavan in nitesh tiwaris ramayan film | Loksatta

KGF स्टार यश साकारणार रावणाची भूमिका; बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्याला केलं रिप्लेस

सध्या दाक्षिणात्य अभिनेत्यांची जोरदार चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची क्रेझ दिसून येत आहे

star yash
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

कन्नड सुपरस्टार यशने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अभिनेता यशने ‘KGF Chapter 1’ या चित्रपटाच्या माध्यमाने प्रेक्षकांच्या मनामध्ये ठसा उमटविला, त्यानंतर याच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. आज त्याचे जगभरात चाहते आहेत. प्रेक्षकांना आता त्याच्या पुढील चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच हा अभिनेता आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

‘दंगल’, ‘छीछोरे’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे नितेश तिवारी आता रामायणावर आधारित एक चित्रपट घेऊन येणार आहेत. विशेष म्हणजे यात कन्नड सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र यावर अद्याप घोषणा झाली नाही. पिंकव्हिलाच्या एका अहवालातून समोर आले आहे की नितीश आणि चित्रपटाचे निर्माते यांनी रावणाची भूमिका साकारण्यासाठी यशशी संपर्क साधला आहे. मात्र या भूमिकेसाठी हृतिक रोशनची निवड करण्यात आली होती.

Photos : बॉक्स ऑफिसवर दमदार कमबॅक करणाऱ्या किंग खानने ‘हे’ फ्लॉप चित्रपटदेखील दिलेत

माध्यमांच्या माहितीनुसार हृतिक रोशनने नुकताच विक्रम वेधा चित्रपट केला ज्यात त्याने नकारात्मक पात्र साकारले होते. त्यामुळे त्याला पुन्हा असे पात्र साकारायचे नाही. या चित्रपटात रामच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार अशी चर्चा आहे.

बॉलिवूडचे अनेक कलाकार दाक्षिणात्य चित्रपटात काम करत आहेत तर दाक्षिणात्य अभिनेते आता बॉलिवूड चित्रपटात काम करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊतदेखील रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट यावर्षी घेऊन येत आहे. ज्यात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत असून सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 20:11 IST
Next Story
शाहरुख खान अखेर मौन सोडणार; ‘पठाण’च्या घवघवीत यशानिमित्त कलाकार प्रथमच मीडियाशी साधणार संवाद