Kangana Ranaut Congratulate Donald Trump : अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. या विजयावर जगभरातील नेत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असताना, बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतनेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

कंगनाने ट्रम्प यांच्या एका फोटोचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात एका सभेदरम्यान त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे. त्या फोटोत ट्रम्प एका हल्लेखोराच्या हल्ल्यातून बचावतात आणि पुन्हा भाषण देताना दिसतात. कंगनाने लिहिले, “जर मी अमेरिकेत असते, तर मी त्यालाच मत दिलं असतं, जो गोळीबारातून बचावला, पुन्हा उभा राहिला आणि भाषण सुरू ठेवलं… टोटल किलर!”

हेही वाचा…ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केला मोठा ट्विस्ट

कंगनाने आणखी एका पोस्टमध्ये उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या पराभवाबद्दल आपले विचार मांडले. तिने हॉलीवूडमधील ज्या सेलिब्रिटींनी कमला हॅरिस यांना समर्थन दिले, त्यांच्यावर टीका केली आहे. टेलर स्विफ्ट, बेयॉन्से, जॉर्ज क्लूनी, एरियाना ग्रांडे, जेनिफर लोपेझ, बेन स्टिलर यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींची कोलाज इमेज शेअर करत कंगनाने लिहिले, “तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा या कलाकारांनी कमला हॅरिस यांचे समर्थन केले, तेव्हा त्यांच्या रेटिंग्समध्ये तीव्र घट झाली होती.” या पोस्टद्वारे कंगनाने हॉलीवूड सेलिब्रिटी आणि कमला हॅरिस यांच्यावर टीका केली आहे.

kangana ranaut critcises hollywood actors for supporing kamala harris
कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्या पराभवाबद्दल आपले विचार मांडले. तर ट्रम्प यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. (Photo Credit – Kangana Ranaut Instagram)

राजकारण आणि विविध मुद्द्यांवर बेधडक मतं मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगना रणौतने ट्रम्प यांच्या समर्थनार्थ आणखी एक स्टोरी पोस्ट करत लिहिले, “एक छान कमबॅकची कथा. अभिनंदन अमेरिका.” तिने ट्रम्पचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यात कानाला गोळी लागून रक्तस्त्राव होत असतानाही ते भाषण करत असल्याचे दिसते.

हेही वाचा…‘भूल भुलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेनची’ टक्कर टाळण्यासाठी भूषण कुमार यांनी घेतली होती अजय देवगणची भेट, पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कामाच्या आघाडीवर कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑक्टोबर २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु अनेक कारणांमुळे त्याच्या प्रदर्शनाला विलंब झाला आहे. मागील महिन्यात सेन्सॉर बोर्डाने आवश्यक बदल सुचवून चित्रपटाला U/A प्रमाणपत्र दिले आहे. मात्र, अद्याप कंगनाने प्रदर्शनाची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही.