अभिनेत्री कंगना रणौत तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील एखादा वाद असो किंवा राजकीय विषय, ती आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. तिच्या बोलण्यातून अनेकदा ती तिला न पटणाऱ्या गोष्टींवर भाष्य करत असते. बॉलिवूडवर आणि बॉलिवूड कलाकारांवरही तिने आतापर्यंत अनेकदा निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा तिने काही बॉलिवूड कलाकारांबद्दलचा तिचा राग व्यक्त केला आहे. यावेळी तिने राष्ट्रविरोधी कलाकारांवर टीका केली आहे.

आणखी वाचा : गोविंदाच्या ‘हिरो नंबर १’ या सुपरहिट चित्रपटाचा येणार रिमेक, ‘हा’ अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

नुकतंच कंगनाने ‘आज तक’च्या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये कंगना नेहमीप्रमाणे तिच्या खरमरीत शैलीत उत्तरं दिली. ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, साऊथचे चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर कंगनाने भाष्य केलं आहे. तसंच बॉलिवूडमध्ये राष्ट्रविरोधी गँग आहे, जी परदेशात जाऊन भारताची बदनामी करते असं म्हणत तिने बॉलिवूड कलाकारांवर टीका केली. यावेळी तिने आमिर खानच्या नावाचाही उल्लेख केला.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील माफिया आणि गँग्सबद्दल बोलताना तिने स्पष्टपणे तिचं म्हणणं मांडलं. ती म्हणाली, “मी राष्ट्रवादी आहे. पण बॉलिवूडमध्ये राष्ट्रविरोधी टोळी आहे. इंडस्ट्रीत आज अनेक सुपरस्टार्स आहेत ज्यांना विशेष अधिकार प्राप्त आहेत. बॉलिवूड चित्रपटांवर आज प्रेक्षक बहिष्कार का घालत आहेत? आता आमिर खानच बघा. तो देशाबाहेर जातो आणि देशाची बदनामी करून येतो. अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रश्न उद्भवतो की, मी तुला माझा स्टार का मानू? आत्तापर्यंत भारतीय माणूस हा लबाड असतो, तो लबाडी करतो असे तुम्ही विनोदी शैलीत स्क्रीनवर दाखवत आला आहात, पण आता हे चालणार नाही. आजच्या भारतीयाला सन्मान हवा आहे. त्याचे देशावर प्रेम आहे. मग असे भारतीय प्रेक्षक आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ का पाहतील?”

हेही वाचा : आलिया पाठोपाठ कंगनाही साकारणार देहविक्री करणाऱ्या स्त्रीची भूमिका; बायोपिकबद्दल पहिल्यांदाच केला खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही कंगनाने अनेकदा बॉलिवूड कलाकारांवर उघडपणे निशाणा साधला आहे. कंगनाच्या या व्यक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. कंगना इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही तिनेच केलं आहे. या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला होता. तो लोकांना चांगलाच आवडला जगन आता तिच्या या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट बघत आहेत.