२०२२ या वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाने जगभरातील लोकांना दखल घ्यायला भाग पाडलं. भारतीय बॉक्स ऑफिसवर तर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. आधी फक्त कन्नडमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर इतर ३ भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीला रातोरात स्टार बनवलं.

रिषभबरोबर चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सप्तमी गौडा हिलासुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळाली. सप्तमी आता हिंदी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच हाती आलेल्या वृत्तानुसार सप्तमी आता हिंदी चित्रपटात नशीब आजमावणार आहे. कांताराच्या घवघवीत यशानंतर तिला मिळणारी ही ओळख फारच अभिमानास्पद आहे.

आणखी वाचा : उर्फी जावेदने मुंबई पोलिसांकडे नोंदवला जबाब; म्हणाली “भारताच्या संविधानाने मला…”

सप्तमी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटात पदार्पण करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबद्दल नुकतंच सप्तमीने सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि विवेक अग्निहोत्री यांनीदेखील तिचं या नव्या प्रोजेक्टमध्ये स्वागत करण्याचं ट्वीट केलं आहे. या संधीसाठी तिने विवेक अग्निहोत्री यांचे आभार मानले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवेक अग्निहोत्री यांच्या या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्ट रोजी तब्बल ११ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, नाना पाटेकर, पल्लवी जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता कांतारा फेम अभिनेत्रीचीसुद्धा यात वर्णी लागल्याने प्रेक्षक या चित्रपटाची फार उत्सुकतेने वाट बघत आहेत.