सध्या ‘कांतारा’ या दाक्षिणात्य चित्रपटाची देशभरात चर्चा सुरु आहे. याचं कारणही तितकंच खास आहे. अभिनेता ऋषभ शेट्टीच्या या चित्रपटाने ‘केजीएफ चॅप्‍टर 2’, ‘आरआरआर’ चित्रपटांना मागे टाकलं आहे. ‘कांतारा’ला IMDb वर १० पैकी ९.६ रेटिंग मिळाली आहे. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा सगळ्यात मोठा रेकॉर्ड असल्याचं बोललं जात आहे. शिवाय हा चित्रपट भारतातील नंबर वन चित्रपट ठरला आहे. कन्नड चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा रेकॉर्ड आहे. ‘कांतारा’ने सलमान खानच्या चित्रपटालाही मागे टाकलं आहे.

‘कांतारा’ चित्रपट ३० सप्टेंबरला कन्नड व मल्याळममध्ये प्रदर्शित झाला. शुक्रवारी (१५ ऑक्टोबर)ला हा चित्रपट हिंदी बॉक्सऑफिसवर दाखल झाला. आतापर्यंत या चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. कमाईच्याबाबतीतही ‘कांतारा’ सरस ठरत आहे. ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘गॉड फादर’ या तेलुगू चित्रपटालाही ‘कांतारा’ने टक्कर दिली आहे.

‘गॉड फादर’मध्ये सलमान पाहुणा कलाकार म्हणून झळकला होता. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त एक कोटी रुपयांची कमाई केली. इतकंच नव्हे तर नयनतारा, चिरंजीवी सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. तरीही चित्रपटाची कमाई पाहता या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचंच चित्र पाहायला मिळालं.

आणखी वाचा – ‘कंतारा’ भारतातील नंबर वन चित्रपट! ‘KGF 2’, ‘RRR’ पेक्षाही ठरला सरस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण ‘कांतारा’मध्ये कोणताच मोठा कलाकार नसताना प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी चित्रपटाने एक कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली. शिवाय चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहता हा हिंदी, तमिळ, तेलुगू भाषेमध्ये ‘कांतारा’ प्रदर्शित झाला आहे. १६ कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडत आहे.