बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा कायमच चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून करण जोहरचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडिआवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत करण जोहर हा अभिनेत्री अनुष्का शर्माचे करिअर उद्ध्वस्त करण्याबद्दल बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, विवेक अग्निहोत्री यांसह अनेक कलाकारांनी त्यावर टीका केली होती. यानंतर आता त्याने याप्रकरणी मौन सोडत भाष्य केले आहे.

करण जोहर हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने एक शायरी पोस्ट केली आहे. याद्वारे त्याने त्याच्यावर टीका करण्यांना अप्रत्यक्षरित्या उत्तर दिल्याचे बोललं जात आहे.
आणखी वाचा : “या पृथ्वीवर तुझ्यापेक्षा सुंदर कोणीही नाही” २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचे प्रेमपत्र, म्हणाला “जॅकलिन माय बेबी…

करण जोहरची पोस्ट

“लगा लो इल्जाम….
हम झुकने वालों में से नहीं,
झूठ का बन जाओ गुलाम,
हम बोलने वालों में से नहीं,
जितना नीचा दिखाओगे,
जितना आरोप लगाओगे,
हम गिरने वालों में से नहीं,
हमारा कर्म हमारी विजय है,
आप उठा लो तलवार,
हम मरने वालों में से नहीं।” असे करण जोहरने यात म्हटले आहे.

करण जोहर पोस्ट

करण जोहरच्या या पोस्टनंतर त्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्याच्या या पोस्टनंतर त्याने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिल्याचेही बोललं जात आहे. पण करणने यात कोणाचेही नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे.

आणखी वाचा : “मला अनुष्काचं करीअर…” खुद्द करण जोहरने दिलेली ‘या’ गोष्टीची कबुली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान बऱ्याच कलाकारांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचा आरोप करण जोहरवर बऱ्याचदा झाले आहेत. करण जोहरने अशाचप्रकारे अनुष्का शर्माचं करिअर उद्ध्वस्त करायचाही प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वी करणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. “मला अनुष्का शर्माचं करिअर खरंच उद्ध्वस्त करायचं होतं. कारण जेव्हा मला आदित्य चोप्राने तिचा फोटो दाखवला तेव्हाच मी तिला घेऊ नकोस असा सल्ला आदित्यला दिला होता. त्यावेळी अनुष्काच्या ऐवजी माझ्या डोक्यात वेगळ्याच अभिनेत्रीचं नाव होतं.” असे त्याने म्हटले होते.