करण जोहरला एक मुलगा व एक मुलगी आहे. तो अविवाहित आहे आणि सात वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्यांचा बाबा झाला. करण व त्याची आई हिरू जोहर दोघेही या मुलांचा सांभाळ करतात, पण आता मुलं आईबद्दल प्रश्न विचारत असल्याचं करणने सांगितलं. यश व रुही अशी करणच्या मुलांची नावं आहेत. करणची आई ८१ वर्षांची आहे. तो आईबरोबर एकल पालक म्हणून मुलांची काळजी घेतो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणने खुलासा केला की त्याची मुलं त्यांच्या जन्माविषयी प्रश्न विचारू लागली आहेत. फेय डिसूझाला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “हे एक आधुनिक कुटुंब आहे आणि ही एक असामान्य परिस्थिती आहे. ‘आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो? मम्मा ही आमची खरोखरची मम्मा नाही, ती आजी आहे’ अशी प्रश्न आता मला विचारण्यात येत आहेत. ही परिस्थिती कशी हाताळता येईल यावर मार्ग काढण्यासाठी आता मी त्यांच्या शाळेत जात आहे, समुपदेशकाकडे जात आहे. हे सगळं खूप अवघड आहे. पालक होणं सोपं नाही.”

गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”

करणने त्याच्या असुरक्षिततेबद्दल भाष्य केलं. “जेव्हा मी माझ्या मुलाला साखर खाताना पाहतो आणि त्याचं वजन वाढलंय हे मला दिसतं तेव्हा मला त्याची खूप काळजी वाटते. पण मी त्याला त्याबद्दल बोलू इच्छित नाही कारण हेच तर वय आहे जेव्हा तो मनसोक्त जगू शकतो. मला वाटतं त्याने कायम आनंदी राहावं,” असं करण म्हणाला.

सोनाक्षी-झहीरच्या लग्नाला मुलाच्या गैरहजेरीबद्दल शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, “आमच्या कुटुंबाचे नाव खराब…”

करण त्याच्या मुलाला क्रिकेट किंवा फुटबॉल खेळायला सांगतो आणि तो ज्या गोष्टी करू शकला नाही त्या सर्व गोष्टी करायला सांगतो. “बाबा म्हणून मी असं करायला नको. माझी इच्छा आहे की माझ्या मुलाने व मुलीने त्यांना हवं तसं जगावं, स्वतंत्र व्यक्ती असावं,” असं तो म्हणाला. करणने एकदा त्याच्या मुलाला वजनावरून टोकलं होतं आणि नंतर त्याची माफी मागितली होती, ती आठवण सांगितली.

Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी म्हणालो ‘यश, तुझं वजन वाढलं आहे’. आम्ही सुट्टीवर होतो आणि मी त्याला असं बोललो. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेलो आणि स्वतःलाच म्हणालो, ‘तू असं का वागलास?’ मग मी बाहेर गेलो आणि त्याला मिठी मारली आणि म्हटलं, मला खरंच माफ करा, तू तुला हवं ते खा”, असा प्रसंग करणनने सांगितला.