scorecardresearch

Premium

Kal Ho Naa Ho 20 years : “माझ्या वडिलांचा शेवटचा चित्रपट”, करण जोहरची भावुक पोस्ट; म्हणाला, “त्यांचं अस्तित्त्व…”

Kal Ho Naa Ho 2o Years Completed : ‘कल हो ना हो’ चित्रपटासाठी करण जोहरची भावुक पोस्ट, म्हणाला…

2o Years of Kal Ho Naa Ho Unknown Facts in Marathi
'कल हो ना हो' चित्रपटासाठी करण जोहरची भावुक पोस्ट

शाहरुख खान, सैफ अली खान आणि प्रीती झिंटा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘कल हो ना हो’ चित्रपटाला आज २० वर्ष पूर्ण झाली आहेत. २८ नोव्हेंबर २००३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने प्रत्येकाच्या मनावर एक वेगळीच जादू केली. शाहरुखने साकारलेला अमन माथुर असो किंवा प्रीतीने साकारलेली नैना यामधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलंसं वाटलं. ज्यांनी हा चित्रपट अनेकदा पाहिलाय असे लोक सुद्धा क्लायमॅक्सला भावुक होतात. हेच वेगळेपण ‘कल हो ना हो’ने आज २० वर्षांनंतरही जपलं आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने या चित्रपटासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

करण जोहरने या चित्रपटातील महत्त्वाचे क्षण एका व्हिडीओच्या रुपात शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. अमन माथुरचं नैनावर असलेलं प्रेम, दोघांची मैत्री, रोहित पटेल आणि नैनाचं लग्न, कुटुंबीयांमध्ये असलेलं प्रेम याची सुंदर झलक करणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

shahid-kapoor-rang-de-basanti
‘रंग दे बसंती’ चित्रपटाला नकार देण्याचा शाहिद कपूरला होतोय पश्चात्ताप; अभिनेता म्हणाला, “दुर्दैवाने मला…”
kabhi-haan-kabhi-naa
‘कभी हां कभी ना’च्या रिमेकमध्ये शाहरुख खानची भूमिका कुणी करावी? सूचित्रा कृष्णमूर्ती म्हणाल्या, “हे पात्र…”
Shivrayancha Chhava Movie Review
Shivrayancha Chhava Movie Review : अतिरंजक शौर्यगाथा
Mahesh Manjrekar
कधी तरी मरू या भीतीमुळे आजचं जगणं कधीच थांबवू नये – महेश मांजरेकर

करण लिहितो, “या चित्रपटाचा संपूर्ण प्रवास माझ्यासाठी खूपच भावनिक होता. आज अनेक वर्ष उलटून गेली तरी प्रत्येकाच्या मनात ‘कल हो ना हो’च्या आठवणी ताज्या आहेत. उत्तम कथानक, तगडी स्टारकास्ट या चित्रपटात सर्वकाही होतं. फक्त कलाकारांचं नव्हे तर या चित्रपटासाठी कॅमेऱ्यामागे काम करणाऱ्या प्रत्येकाचं खूप खूप अभिनंदन!”

हेही वाचा : “We are engaged…”, पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो समोर

“माझ्यासाठी हा चित्रपट फार जवळचा आहे कारण, या चित्रपटानिमित्त मी आणि माझ्या वडिलांनी धर्मा प्रोडक्शनसाठी शेवटचं एकत्र काम केलं होतं…हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. आजही चित्रपट पाहताना त्यांचं अस्तित्त्व मला प्रत्येक सीनच्या फ्रेममध्ये जाणवतं. बाबा खूप खूप धन्यवाद…आम्हाला प्रत्येक गोष्टी मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप आभार! तुम्ही नेहमी खऱ्याच्या बाजूने उभे राहिलात…तुमची मला कायम आठवण येते…” अशी भावुक पोस्ट करणने शेअर केली आहे.

हेही वाचा : बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेला अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ लवकरच येणार ओटीटीवर; वाचा कधी व कुठे पाहता येणार?

करण शेवटी लिहितो, “धन्यवाद निखिल (‘कल हो ना हो’चा दिग्दर्शक) एक दिग्दर्शक म्हणून हा तुझा पहिलाच चित्रपट होता आणि तुला आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम या चित्रपटामुळे मिळालं. एवढ्या सुंदर चित्रपटासाठी तुझेही खूप खूप आभार!”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karan johar shares emotional post as kal ho naa ho movie completed 20 years sva 00

First published on: 28-11-2023 at 12:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×