बॉलिवूडमधील क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकले आहेत. दोघांनी जैसलमेर येथील सूर्यगड पॅलेसमध्ये ७ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. त्यानंतर लग्नाचे फोटो शेअर केले. गेले काही दिवस या दोघांच्या लग्नाची चर्चा होती. अखेर हे लग्न झालं असून अडवाणींची लेक मल्होत्रांची सून झाली आहे.

सिद्धार्थ व कियाराने फोटो शेअर करत आमची पर्मनंट बूकिंग झाली आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या फोटोंवर बॉलिवूड कलाकारांसह चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दोघांनाही त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

या लग्नासाठी निर्माता व दिग्दर्शक करण जोहर पोहोचला होता. सिद्धार्थने करणबरोबर काम करत त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. तसेच करणच्या स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तसेच कियारा अडवाणी व करण जोहरचं बाँडिंगही खूप खास आहे. अशातच करणने सिद्धार्थ व कियारासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

Photos : “कायमस्वरुपी बुकींग झालंय…” सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणीच्या लग्नाचे फोटो अखेर समोर, पाहा शाही थाट

करणने लिहिलं, “मी त्याला (सिद्धार्थला) दीड दशकांपूर्वी भेटलो होतो…. शांत, कणखर आणि संवेदनशील…मग मी तिला (कियारा) खूप वर्षांनी भेटलो… शांत, कणखर आणि तितकीच संवेदनशील… मग ते एकमेकांना भेटले आणि मला त्या क्षणी कळले की हे दोघं एक चांगला बाँड निर्माण करू शकतात आणि एकत्र सर्वात जादुई लव्ह स्टोरी तयार करू शकतात…त्यांना एकत्र पाहणे हे परंपरा व कुटुंबात रुजलेल्या एका परीकथेसारखं आहे.
आज प्रेमाच्या मंडपात त्यांनी शपथ घेतली, तेव्हा प्रत्येकाला एक वेगळीच उर्जा जाणवली. मी अभिमानाने, आनंदाने, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत बसलो. सिड-कियारा मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो, तुमचं संपूर्ण आयुष्य आजच्याच दिवसासारखं असो,” असं प्रेमळ व भावूक कॅप्शन देत करणने सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शेरशाह’ चित्रपटात एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडलेले सिद्धार्थ व कियारा आता लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.