बॉलीवूडची बेबो करीना कपूर अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. प्रेग्नन्सीनंतर मुलांचं संगोपन, तिला आलेलं आईपण याबाबत करीना अनेकदा मुलाखती आणि शोमध्ये बोलली आहे. महिलांच्या आरोग्यविषयक गोष्टींवर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे, असेही ती अनेकदा म्हणते.

करीना कपूर-खानच्या ‘प्रेग्नन्सी बायबल : द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी’ या पुस्तकात तिने याबद्दलच्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. हे पुस्तक २०२१ मध्ये करीनाने प्रकाशित केले होते. तथापि, या पुस्तकात ‘बायबल’ हा शब्द वापरल्याबद्दल करीनाला कायदेशीर नोटीस मिळाली आहे. याबाबत ‘एनडीटीव्ही’ने वृत्त दिले आहे.

हेही वाचा… बालपणीच्या गौरव मोरेला पाहिलंत का? फिल्टरपाड्याच्या बच्चनने शेअर केला शाळेतला फोटो, म्हणाला…

मध्य प्रदेश उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती गुरपाल सिंग अहलुवालिया यांच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाने वकील क्रिस्टोफर अँथनी यांच्या याचिकेवर करीना आणि पुस्तकविक्रेत्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी नोटीस जारी केली आहे. अभिनेत्री करीनाच्या या पुस्तकात ‘बायबल’ शब्द वापरण्यामागील कारणाबाबत न्यायालयाने अभिनेत्री-लेखिकेकडून उत्तर मागितले आहे. याचिकाकर्त्याने पुस्तक जतनावर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर प्रकाशकांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

करीनाच्या या पुस्तकामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. जबलपूरचे सामाजिक कार्यकर्ते व खासदार क्रिस्टोफर अँथनी यांनी पुस्तकाच्या शीर्षकात ‘बायबल’ शब्द वापरणे हे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावणारे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे मत व्यक्त करताना ते म्हणाले, “बायबल हे जगभरातील ख्रिश्चन धर्माचे पवित्र पुस्तक आहे आणि करीना कपूर-खानच्या गर्भधारणेची बायबलशी तुलना करणे चुकीचे आहे.”

हेही वाचा… हॉलीवूड कलाकारानंतर आता बॉलीवूड स्टार हृतिक रोशनने केली अ‍ॅपलच्या ‘त्या’ जाहिरातीवर टीका; अभिनेता म्हणाला…

हेही वाचा… ‘बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो

२०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकात करीनाच्या गरोदरपणाचा प्रवास आणि गर्भवती मातांसाठी टिप्स आणि सूचनांचा समावेश आहे. पोलिसांनी अभिनेत्रीविरुद्ध एफआयआर नोंदविण्यास नकार दिल्यानंतर याचिकाकर्त्याने करीनाविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली. शीर्षकात ‘बायबल’ या शब्दाचा वापर कसा आक्षेपार्ह होता हे स्पष्ट करण्यात ते अयशस्वी ठरले. या कारणास्तव कनिष्ठ न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली. नंतर अतिरिक्त सत्र न्यायालयानेही त्यांची तक्रार फेटाळून लावली.

करीना कपूरच्या प्रेग्नन्सी पुस्तकाबद्दल…

करीना कपूर खानच्या ‘प्रेग्नन्सी बायबल : द अल्टीमेट मॅन्युअल फॉर मॉम्स-टू-बी’ या पुस्तकात गर्भवती मातांसाठी आहारतज्ज्ञ व फिटनेस तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्सचा समावेश आहे. गर्भवती मातांनी स्वत:ची काळजी कशी घ्यावी आणि इतर अनेक गोष्टी या पुस्तकात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, करीना कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले, तर करीना ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात झळकणार आहे. तर हंसल मेहता यांचा आगामी चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मध्येदेखील ती दिसणार आहे.