scorecardresearch

करीना कपूर खानने राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये साजरा केला सासूबाईंचा वाढदिवस, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क

करीना कपूर खानने शर्मिला टागोर यांचा वाढदिवस राजस्थानमध्ये दणक्यात साजरा केला. त्याचबाबत जाणून घेऊया.

करीना कपूर खानने राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये साजरा केला सासूबाईंचा वाढदिवस, एका दिवसाचं भाडं ऐकून व्हाल थक्क
करीना कपूर खानने शर्मिला टागोर यांचा वाढदिवस राजस्थानमध्ये दणक्यात साजरा केला. त्याचबाबत जाणून घेऊया.

करीना कपूर खान तिच्या कामामध्ये नेहमीच व्यग्र असते. पण कामामधून वेळ काढत ती कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवणं कधीही विसरत नाही. आताही करीना तिच्या कुटंबासह राजस्थानमध्ये आहे. ८ डिसेंबरला (गुरुवारी) सैफ अली खानची आई व सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस होता. याचनिमित्त खान कुटुंबिय राजस्थानला पोहोचलं.

आणखी वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीने रणवीर सिंगवर कमेंट करताच पुढे अभिनेत्याने काय केलं पाहा? स्वतःच म्हणाली, “…म्हणूनच मी त्याच्यावर”

शर्मिला यांनी सैफ-करीना, सोहा अली खान, तैमुरसह जैसलमेरमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. यादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. करीनासह संपूर्ण खान कुटुंबियांना शर्मिला यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन करायचं होतं. म्हणूनच त्यांनी राजस्थान येथील जैसलमेरची निवड केली.

जैसलमेर येथील एक रिसॉर्टमध्ये शर्मिला यांनी कुटुंबियांसह वाढदिवस साजरा केला. करीनाने यादरम्यानचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले. यामध्ये शर्मिला यांनी नातवंडांबरोबर केक कट केला असल्याचं दिसत आहे.

आणखी वाचा – लग्नानंतर नाशिकला पोहोचले राणादा-पाठकबाई, अक्षया देवधरच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

जैसलमेरमध्ये शर्मिला यांचा वाढदिवस ज्या रिसॉर्टमध्ये साजरा करण्यात आला त्याचं एक दिवसाचं भाडं तब्बल ५० हजार रुपये इतपत आहे. ‘द सराय’ असं या रिसॉर्टचं नाव आहे. जैसलमेरमधील महागड्या रिसॉर्टपैकी हे एक रिसॉर्ट आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 19:51 IST

संबंधित बातम्या