scorecardresearch

“जर चित्रपट नसतील तर…” बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर करीना कपूर खानचं मोठं वक्तव्य

करीनाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा तिला ट्रोल केलं जात आहे

“जर चित्रपट नसतील तर…” बॉयकॉट बॉलिवूड ट्रेंडवर करीना कपूर खानचं मोठं वक्तव्य
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे तर दुसरीकडे ‘बॉयकॉट बॉलिवूड’ या ट्रेंडने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा चित्रपटावर अनावश्यक टिप्पणी करणाऱ्या लोकांवर भाष्य केलं होतं. त्यानंतर पुन्हा बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीज या मुद्द्यावर बोलू लागले आहेत. नुकतंच अभिनेत्री करीना कपूर खाननेसुद्धा यावर मौन सोडलं आहे.

कलकत्ताच्या एका कार्यक्रमाम्यान या बॉयकॉट ट्रेंडवर करीनाने भाष्य केलं आहे. करीनाला या मुलाखतीदरम्यान बॉयकॉट बॉलिवूड या ट्रेंडबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना करीना म्हणाली, “मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. जर असं झालं लोकांचं मनोरंजन कसं होईल, लोकांच्या आयुष्यात आनंद कसा येईल, प्रत्येकालाच करमणूक हवी आहे, जर चित्रपटच नसतील तर प्रेक्षकांचं मनोरंजन कसं होईल?”

आणखी वाचा : Ae Watan Mere Watan Trailer : ‘भारत छोडो’ आंदोलन अन् एका कॉलेजवयीन तरुणीचा संघर्ष; सारा अली खानच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

करीनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. करीनाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा तिला ट्रोल केलं जात आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या वेळेसही करीनाला असंच ट्रोल केलं जात होतं. तेव्हा करीनाचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता, ज्यात तीने आमचे चित्रपट बघू नका असं प्रेक्षकांना संबोधून म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यामुळे बॉयकॉट ट्रेंड आणखी जास्त व्हायरल झाला होता.

आता पुन्हा करीनाच्या वक्तव्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. गेल्यावर्षी आलेल्या आमिर खान आणि करीना कपूरच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाला या ट्रेंडचा चांगलाच फटका बसला. यानंतर आलेल्या बऱ्याच चित्रपटांनासुद्धा याचा फटका बसला. आता पुन्हा ‘पठाण’च्या निमित्ताने या ट्रेंडने डोकं वर काढलं आहे. यावेळी ‘पठाण’वर याचा परिणाम होणार की नाही ते येणारी वेळच ठरवेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 12:46 IST

संबंधित बातम्या