Kareena Kapoor Khan post for Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या सेमीफायनल सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि फायनलमध्ये धडक दिली. या कामगिरीनंतर भारतीय महिला क्रिकेट संघावर वर्षाव होतोय. अभिनेत्री करीना कपूरने हा सामना मैदानात बसून पाहिला. भारतीय महिला संघाच्या विजयानंतर करीना कपूरने खास पोस्ट केली आहे.

करीना कपूर खान UNICEF India ची राष्ट्रीय अॅम्बेसिडर म्हणून महिला विश्वचषक २०२५ च्या सेमी फायनलला हजेरी लावली होती. करीना कपूरने मैदानात बसून पूर्ण सामना पाहिला. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाबरोबर फोटो काढले. भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर करीना कपूरने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

भारतीय महिला संघाबरोबरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत करीनाने लिहिलं, “मुली जिद्द आणि दृढनिश्चयाच्या जोरावर सगळं काही करू शकतात… शाब्बास टीम इंडिया… मुली आता फायनलमध्ये.”

पाहा पोस्ट

kareena kapoor post for team india womens world cup 2025 jemimah rodrigues
करीना कपूरची टीम इंडियासाठी पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

‘Take a Bow Fabulous Jemimah’ म्हणत करीनाने या सामन्याची हिरो ठरलेल्या जेमिमासाठी एक पोस्ट केली.

kareena kapoor post for jemimah rodrigues
करीना कपूरची जेमिमासाठी पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय संघाला ३३९ धावांचं आव्हान दिलं होतं. भारताकडून शफाली वर्मा १० धावा तर स्मृती मानधना २४ धावा करून बाद झाल्या. त्यानंतर जेमिमा रॉड्रीग्ज व कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी १६७ धावांची भागीदारी केली. जमिमाह रॉड्रीग्ज हिने नाबाद १२७ धावा करून भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि संघातील इतर खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने अंतिम फेरीत धडक दिली आहे. आता भारताला महिला विश्वचषक जिंकण्याची संधी मिळाली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.