बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. करीना आणि सैफमध्ये १० वर्षांचं अंतर आहे. १० वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या सैफबरोबर लग्न का केलं याबाबत करीनाने खुलासा केला आहे.

हेही वाचा- ‘या’ एका भीतीमुळे रणबीर कपूरने नाकारलेला हॉलिवूड चित्रपट; अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

करीनाने ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे की, माझी इच्छा होती म्हणून मी लग्न केले. मी त्यावेळेस लग्न केले ज्यावेळेस कोणतीच अभिनेत्री लवकर लग्न करत नव्हती. करीनाने २०१२ मध्ये बॉलिवू़ड अभिनेता सैफ अली खान बरोबर लग्न केले. १० वर्ष मोठ्या असणाऱ्या सैफबरोबर लग्न केल्यानंतर करीनाला मोठ्या प्रमाणात टीकेचा सामना करावा लागला होता २०१६ साली करीनाने तैमूरला जन्म दिला. तर २०२१ मध्ये करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असून त्यांनी त्याचे नाव ‘जहांगीर’ ठेवले आहे. लग्नाबरोबर करीनाने करिअरवरही भाष्य केले आहे.

हेही वाचा- “पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतलं” म्हणणाऱ्या पाकिस्तानींना अदनान सामीने सुनावलं; म्हणाला, “तिथे मी एका अत्यंत…”

करीना म्हणाली, “पूर्वी लग्न करणं ही एखाद्या अभिनेत्रीसाठी मोठी गोष्ट मानली जायची. पण आता काळानुसार सर्व काही बदललं आहे. तुम्हाला तुमच्या वयाचा अभिमान असायला हवा. आज महिला धाडसी झाल्या आहेत. त्या धाडसी निर्णय घेत आहेत. आता तुमच्या वैवाहिक जीवनाचा तुमच्या करिअरवर कोणताही परिणाम होत नाही. आता अनेक चित्रपट निर्माते जोखीम पत्करून वेगवेगळ्या लोकांना संधी देत आहेत. अनेक ​​ऑफबीट स्क्रिप्टवर काम करत आहेत. अनेक संधीही निर्माण होताना दिसत आहेत.

हेही वाचा- रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’च्या सेटवरील व्हिडिओ लिक; चाहत्यांनी काढली ‘कबीर सिंग’ची आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करीना ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत थ्री इडियट्स, बजरंगी भाईजान, जब वी मेट असे अनेक हिट चित्रपट दिलेआहेत. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.