‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट येऊन २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे तरी आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटामुळे हृतिक रोशन तरुणाईच्या गळ्यातील ताईत झाला. राकेश रोशन दिग्दर्शित या चित्रपटात हृतिकने दुहेरी भूमिका साकारल्या होत्या. हृतिकबरोबर अभिनेत्री अमिषा पटेलनंही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हृतिकचा पहिलाच चित्रपट ‘ब्लॉकबस्टर हिट’ ठरला होता.

तुम्हाला हे ठाऊक असेलच की या चित्रपटात अमिषा पटेलऐवजी करीना कपूरला घेण्यात आलं होतं. हृतिक आणि करीना या दोघांचाही हा पहिलाच चित्रपट होता. नंतर मात्र करीनाच्या आईने तिला या चित्रपटातून बाहेर काढलं आणि तिथे अमिषा पटेलची वर्णी लागली. २००० साली फिल्मफेअरशी संवाद साधताना खुद्द करीनाने याबद्दल भाष्य केलं आहे. २००० सालीच ‘रेफ्यूजी’ या चित्रपटातून करीनाने अभिषेक बच्चनसह बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, पण ‘कहो ना प्यार है’मध्ये काम न करणं हे आपल्या पथ्यावरच पडलं, असं करीनाचं म्हणणं होतं.

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’पाठोपाठ ‘भेडिया’च्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख ठरली; वाचा कधी अन् कुठे पाहता येणार?

याविषयी करीना म्हणाली, “हा चित्रपट केवळ हृतिकसाठीच करण्यात आला होता. त्याचे वडील राकेश रोशन हे हृतिकच्या प्रत्येक क्लोज-अप शॉट आणि फ्रेमवर पाच तास मेहनत घ्यायचे, पण अमिषाच्या पात्रावर पाच सेकंदसुद्धा त्यांनी वेळ दिला नसेल. चित्रपटात काही सीन्समध्ये अमिषाच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डागही दिसत आहेत, यावरून लक्षात येतं की तिच्यावर काहीच मेहनत घेतली गेली नव्हती, ती चित्रपटात अजिबात सुंदर दिसत नव्हती. एका अर्थी बरंच झालं मी तो चित्रपट केला नाही. त्याहून चांगली गोष्ट म्हणजे मी चित्रपट सोडला तरी हृतिक आणि माझी मैत्री आजही तशीच आहे. हृतिक माझा एक चांगला मित्र आहे, त्याला मिळालेलं यश पाहून मला आनंदच होतो.”

आणखी वाचा : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारी, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी आहे तरी कोण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे तर २०२० मध्ये ‘क्विंट’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक राकेश रोशन यांनीही यावर भाष्य केलं होतं. या मुलाखतीमध्ये राकेश रोशन यांनी करीनाची आई बबिता या चित्रीकरणात फारच लुडबुड करत असल्याने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला हे स्पष्ट केलं होतं. यानंतरही ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘मैं प्रेम की दिवानी हूं’ आणि ‘कभी खुशी कभी गम’सारख्या चित्रपटात हृतिक आणि करीनाने एकत्र काम केलं आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिटदेखील ठरले होते.