scorecardresearch

Premium

तैमुरच्या नावामुळे झालेल्या ट्रोलिंगबद्दल करीना कपूरने प्रथमच मांडली स्वतःची बाजू; हे नाव का ठेवलं? याचंही दिलं उत्तर

मुलाचं नाव ‘तैमुर’ ठेवल्याने सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झाल्या अन् यावरून करीना आणि सैफ अली खान या दोघांनाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं

kareena-kapoor-about-taimur
फोटो : इंडियन एक्सप्रेस आणि सोशल मीडिया

कपूर घराण्याचा वारसा पुढे नेणारी अन् सध्याच्या काळातील आघाडीची अभिनेत्री करीना कपूर ही कायम चर्चेत असते. इंडस्ट्रीमधील गॉसिप गर्ल अशी ओळख असणारी करीना ही आता लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. याआधी आमिर खानबरोबरचच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना झळकली, चित्रपटाला बॉयकॉटचा सामना करावा लागला परंतु करीनाच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

करीनाने नुकतीच ‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘एक्सप्रेस अड्डा’मध्ये हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये करीनाने चित्रपटक्षेत्रातील तिचा आजवरचा प्रवास अन् तिला आलेले अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. या मुलाखतीमध्ये करीनाने हिंदी कमर्शियल हिंदी चित्रपटांना मिळणाऱ्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.

Preventive action against four accused in Ajay Baraskar case
मुंबई : अजय बारसकर प्रकरणातील चार आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
two men beaten to death by mob in thane
चोर असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दोघांचा मृत्यू, अंबरनाथ शहरातील प्रकार, गुन्हा दाखल
illegal abortion pune marathi news, illegal abortion of a young girl pune marathi news,
पुणे : तरुणीचा बेकायदा गर्भपात, डॉक्टर दाम्पत्यासह सहाजणांविरुद्ध पोलिसांची कारवाई; धरणात फेकून देण्याची तरुणीला धमकी

आणखी वाचा : “मी आणि सैफ आम्ही दोघेही…” शाहरुख खानच्या ‘जवान’बद्दल करीना कपूरचं वक्तव्य

याबरोबरच करीनाने सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलही भाष्य केलं. आपल्या मुलाचं नाव ‘तैमुर’ ठेवल्याने सोशल मीडियावर बऱ्याच चर्चा झाल्या अन् यावरून करीना आणि सैफ अली खान या दोघांनाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यावेळी आई म्हणून करीनाच्या मनात नेमक्या काय भावना होत्या याचा तिने खुलासा केला आहे.

करीना म्हणाली, “मला वाटतं कोणत्याही आईला किंवा मुलाला या गोष्टीचा सामना करावा लागू नये. लोक त्यावेळी अशा पद्धतीने का व्यक्त झाले याचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. कोणालाही दुखवायचा आमचा हेतू नव्हता. आमच्या मुलाचं नाव तैमुर आहे, ज्याचा अर्थ आयर्न मॅन असा होता. सैफच्या शेजारी त्याचा एक मित्र रहायचा त्याचं नाव तैमुर होतं अन् सैफला ते फार आवडलं होतं. मुंबईत राहणारा सैफचा तो पहिला मित्र असल्याने त्याचं नाव त्याने आमच्या मुलाचं ठेवायचं ठरवलं.”

पुढे करीना म्हणाली, “यामुळे जेव्हा लोकांनी ट्रोल करायला सुरुवात केली तेव्हा मला या गोष्टीचा धक्काच बसला. मी आणि सैफने ही गोष्ट फार काळजीपूर्वक हाताळली, आम्ही यावर फार वाच्यताही केली नाही. आम्ही फक्त आमच्या निर्णयावर ठाम होतो अन् मी जो निर्णय घेतला त्याचा मला कधीच पश्चात्ताप झालेला नाही.”

करीना लवकरच ‘जाने जान’ या चित्रपटातून ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात करीनाबरोबर विजय वर्मा आणि जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करीनाच्या वाढदिवशी म्हणजेच २१ सप्टेंबरला ‘जाने जान’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Kareena kapoor spekas about trolling happened because of naming their child as taimur avn

First published on: 11-09-2023 at 20:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×