बॉलिवूड सेलिब्रेटी सध्या दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. त्यांचे फोटोही खूप व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन गुरुवारी मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत पोहोचले होते. एवढंच नाही तर एकेकाळी अभिषेकशी लग्न ठरलेली करिश्मा कपूरही पार्टीमध्ये दिसली होती. करिश्माने इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशनमधील ऐश्वर्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मनीषच्या पार्टीत करिश्मा कपूर आणि ऐश्वर्याने एकत्र फोटो काढले होते. यावेळी माधुरी दीक्षितही त्याच्यासोबत पोज देताना दिसली. इंस्टाग्राम स्टोरीवर माधुरी आणि ऐश्वर्यासह फोटो शेअर करताना करिश्माने लिहिलं, ‘OG सह रियुनाइटेड.’ तिने या कॅप्शनसह हार्ट आणि लाइटनिंग इमोजीही पोस्ट केले आहेत. यासह तिने ‘अबाउट नाईट’ असा हॅशटॅग वापरला आहे. हा फोटो शेअर करतना करिश्माने ऐश्वर्या आणि माधुरीलाही टॅग केले. अभिनेत्रीने पार्टीतील तिचे काही फोटोही शेअर केले आहेत.

आणखी वाचा- “ते रात्री अपरात्री तू …” बायकोसाठी कुशल बद्रिकेची खास पोस्ट

karisma kapoor aishwarya rai

दरम्यान ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्यात अनेक वर्षांपासून डेटिंगच्या अफवा होत्या. दोघांचा साखरपुडा होणार होता. अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिचे लग्न करिश्मा कपूरचा चुलत भाऊ निखिल नंदाशी झालं आहे. २००३ मध्ये त्यांचा साखरपुडा मोडला. त्यावेळी रेडिफला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत अभिषेक बच्चनला करिश्मापासून वेगळं होणं आणि त्याचे आजोबा हरिवंशराय बच्चन यांच्या निधनाबद्दल विचारण्यात आलं होतं.

आणखी वाचा- करिश्मा आणि करीना कपूरच्या पार्टीचा व्हिडीओ समोर, नेटकरी म्हणाले “ड्रग्ज आणि दारु…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीत अभिषेक म्हणाला, “मला अर्थातच या सगळ्याचं दुःख आहे. पण मला यातून बाहेर यायला हवं. माझ्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर कोणीही मला याबद्दल जबरदस्तीने बोलण्यास भाग पाडू शकत नाही. ही माझी समस्या आणि माझं दुःख आहे. मी फक्त माझ्या आई-वडिलांना आणि कुटुंबाला उत्तर देण्यास बांधिल आहे.” त्यानंतर अभिषेकने २००७ साली ऐश्वर्याशी लग्न केलं. त्यानंतर करिश्मा आणि ऐश्वर्या फारशा एकत्र दिसल्या नव्हत्या.