कार्तिक आर्यन हा बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता बनला आहे. त्याचं फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे. आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिलेला कार्तिक अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत चाहत्यांच्या भेटीला येत असतो. तर आता एका कार्यक्रमादरम्यान त्याला दुखापत झाली असल्याचं समोर आलो आहे.

कार्तिक आर्यांना पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक असतात. त्यासाठी आवर्जून तर त्याच्या लाईव्ह कार्यक्रमाला येतात आणि कार्यक्रमांमध्ये कार्तिकही चाहत्यांनी केलेली डान्सची मागणी पूर्ण करताना दिसतो. परंतु आता आहे का कार्यक्रमादरम्यान ‘भूल भुलैया’ची सिग्नेचर स्टेप करताना त्याच्या पायाला दुखापत झाली आहे.

आणखी वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”

मीडिया रिपोर्टनुसार कार्तिक नुकताच एका लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्तिक आर्यन त्याच्या ‘भूल भुलैया २’ची सिग्नेचर स्टेप करत होता. यादरम्यान त्याच्या पायाच्या घोटा मुरगळला. पाय मुरगळल्याने त्याच्या पायला दुखापत झाली. त्यामुळे बराच काळ त्याने तो पाय स्टेजवर टेकवलाच नाही. आधी प्रेक्षकांना वाटलं की तो गंमत करत आहे. नंतर जेव्हा त्यांना घडलेल्या प्रकार कळला तेव्हा सर्वांनाच काळजी वाटू लागली.

हेही वाचा : कार्तिक आर्यन करायचा विना तिकीट ट्रेन प्रवास; ‘त्या’ आठवणींना उजाळा देत म्हणाला होता…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परंतु कार्तिकने स्टेजवरून एक्झिट घेतली नाही. वैद्यकीय मदत येईपर्यंत तो जवळपास अर्धा तास तिथेच थांबला होता. वैद्यकीय पथक आणि फिजिओथेरपिस्टने त्याच्या पायाची तपासणी केली आणि त्याला प्राथमिक उपचार दिले. यानंतर डॉक्टरांच्या मदतीने कार्तिक आर्यनला त्याचा पाय खाली टेकवता आला.