अभिनेता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्या आगामी ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. साजिद नाडियादवाला निर्मित हा एक प्रेमकथा चित्रपट आहे. नुकतेच ‘सत्यप्रेम की कथा’ मधील ‘सुन सजनी’ हे गाणे रिलीज झाले, ज्यासाठी निर्मात्यांनी मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातील कियाराबरोबचा कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी ‘संग सजनी’ गाण्याच्या लाँच कार्यक्रमात शानदार एन्ट्री केली. स्टेजवर डान्स करण्यापूर्वी कियाराने आपली सँडल काढून ठेवली होती. पण डान्स झाल्यानंतर कार्तिकने कियाराला सँडल आणून दिली. एवढंच नाही तर तिला सँडल घालण्यास मदतही केली. कार्तिक आणि कियाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. कार्तिकने कियाराला केलेल्या या मदतीचे चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.
‘भूल भुलैया २’ च्या यशानंतर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पुन्हा एकदा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट २९ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.