बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या ‘शेहजादा’ या चित्रपटासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक असल्याचे दिसत आहेत. गेले अनेक दिवस तो या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. पण शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. ही बातमी त्याने स्वतः शेअर केली.

कार्तिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर त्याचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये आर्यन बर्फाने भरलेल्या बादलीत पाय बुडवून बसलेला दिसत आहे. यासोबतच त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीला निळ्या रंगाची पट्टीही चिकटवलेली दिसत आहे. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याची दुखापत गंभीर नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

आणखी वाचा : “‘आरआरआर’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर…” प्रसिद्ध हॉलिवूड निर्मात्याचं ट्वीट चर्चेत

हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, “गुडघा तुटला आहे. २०२३ सालचे आईस बकेट चॅलेंज आता सुरू होत आहे.” त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोवर कमेंट्स करत अनेकांनी त्याला लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना केली. तर दुसरीकडे काही लोक मजेशीर कमेंट करतानाही दिसले.

हेही वाचा : शूटिंग, शूटिंग आणि फक्त शूटिंग…कार्तिक आर्यनने शेअर केले ‘शेहजादा’ चित्रपटाच्या शूटिंगचे फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘शेहजादा’चा ट्रेलर १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर येईल. कार्तिक आर्यनच्या या अॅक्शन पॅकेज थ्रिलर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात कार्तिक आर्यनबरोबर क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.