बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या आगामी ‘शहजादा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. कार्तिक पुन्हा त्याच्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘शहजादा’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कार्तिकसह या चित्रपटात अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्तिक आर्यनच्या ‘शहजादा’ चित्रपटासाठी काही दिवसांपूर्वीच ऑनलाइन टिकिट बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आठ कोटींची कमाई करेल अशी निर्मात्यांना अपेक्षा आहे. परंतु, याशिवाय ‘शहजादा’ चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच तब्बल ६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या म्युझिक, सॅटेलाइट आणि ओटीटी राइट्समधून निर्मात्यांनी ६५ कोटी रुपये कमावले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, म्युझिक राइट्समधून १० कोटी तर सॅटेलाइट राइट्समधून निर्मात्यांनी १५ कोटींची कमाई केली आहे. तर ‘शहजादा’ चित्रपटाच्या ओटीटी राइट्सचा करार ४० कोटींना झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीचा ‘गोल्ड डिगर’ असा उल्लेख, म्हणाला…

हेही वाचा>> “रितेशपासून दूर राहा” पहिल्या पतीबाबत कमेंट करणाऱ्याला राखी सावंतचं उत्तर, म्हणाली “तो माझा…”

‘शहजादा’ चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी ८५ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातील ६५ कोटी चित्रपट बनवण्यासाठी तर इतर २० कोटी प्रमोशनकरिता खर्च करण्यात आले आहेत. चित्रपट बनवण्यासाठी खर्च करण्यात आलेली रक्कम निर्मात्यांना प्रदर्शनापूर्वीच मिळाली आहे.

हेही वाचा>> नताशा स्टँकोविकसह दुसऱ्यांदा लग्न केल्याने हार्दिक पांड्या ट्रोल, नेटकरी म्हणाले “स्वत: हिंदू असून…”

रोहित धवन दिग्दर्शित ‘शहजादा’ चित्रपट येत्या शुक्रवारी १७ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सनॉनसह राजपाल यादवही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसलेल्या ‘पठाण’ला टक्कर देणार का? हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kartik aryan shehzada earned 65cr before releasing the movie kak
First published on: 15-02-2023 at 15:58 IST