बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने नवे विक्रम बनवायला सुरुवात केली. चित्रपटातील कथेने आणि या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. प्रेक्षकांप्रमाणेच अनेक बॉलिवूड कलाकारही या चित्रपटाचं कौतुक करताना दिसत आहेत. अशातच आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनने या चित्रपटासाठी एक खास पोस्ट लिहिली. विशेष म्हणजे कार्तिकने ‘दृश्यम २’ आणि ‘भूल भुलैय्या २’ यांच्यातलं कनेक्शन चाहत्यांशी शेअर केलं.

कार्तिक आर्यन आणि अजय देवगण सध्या गोव्यामध्ये ‘इफ्फी’साठी आले आहेत. यावेळी काढलेला कार्तिक आणि अजयचा एक फोटो कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला. या फोटो बरोबर त्याने लिहिलेल्या कॅप्शनने सगळयांचंच लक्ष वेधलं आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी कॅप्शनमधून ‘भूल भुलैय्या २’मधील रूह बाबा आणि ‘दृश्यम २’ मधला विजय साळगावकर २ ऑक्टोबरला एकत्र होते असा खुलासा त्याने केला.

आणखी वाचा : विश्वसुंदरी मानुषी छिल्लर प्रसिद्ध व्यावसायिकाला करतेय डेट, कोण आहे तो? घ्या जाणून

कार्तिकने कॅप्शनमध्ये लिहिलं, “विजय साळगावकर आणि रूह बाबा त्यांनी २ ऑक्टोबरला गोव्यात एकत्र पावभाजी खाल्ली आणि ३ ऑक्टोबरला सत्संग करून ते मुंबईत आले. पावभाजी खूप छान होती.” कार्तिकची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच हिट होत आहे. या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांना रूह बाबा आणि विजय साळगावकर म्हणून एकत्र बघायला आवडेल असं म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘दृश्यम २’साठी अजय देवगणने आकारलं ‘इतके’ कोटी मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक प्रचंड आतुर होते. २०१४ मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या उत्कंठावर्धक कथेने सर्वांनाच भुरळ घातली. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचीही यशस्वी घोडदौड सुरु आहे.