scorecardresearch

Premium

‘टायगर ३’मधील कतरिनाच्या ‘त्या’ टॉवेल फाइट सीनवर विकी कौशलने सोडले मौन; म्हणाला “माझी बिलकूल इच्छा नाही की..”

‘टायगर 3’मधील कतरिना कैफच्या टॉवेल फाइट सीनवर अभिनेत्रीचा पती अभिनेता विकी कौशलने प्रतिक्रिया दिली आहे.

vicky-kaushal-on- katrina towel fight-scene-in-tiger-3
'टायगर ३' मधील कतरिनाच्या ‘त्या’ टॉवेल फाईट सीनवर विकी कौशलने सोडलं मौन

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या चांगलीच चर्चेत आहे. १२ नोव्हेंबरला तिचा आणि सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘टायगर ३’ चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. चित्रपटाबरोबर यातील कतरिनाच्या टॉवेल फाइट सीनची चर्चा चांगलीच रंगली आहे. या सीनवर कतरिनाचा पती अभिनेता विकी कौशलने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- “आमच्या पिढीला सेक्सची…” मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, “पतीला खुश…”

rang maza vegla fame actress reshma shinde visits shreya bugde new restaurant
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री पोहोचली श्रेया बुगडेच्या नव्या रेस्टॉरंटमध्ये, फोटो पोस्ट करत म्हणाली, “बऱ्याच दिवसांनंतर…”
priya marathe supports ankita lokhande
“तिचा संघर्ष…”, मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेसाठी पोस्ट, ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलंय एकत्र काम, कोण आहे ती?
Kangana Ranaut confirms she is dating someone but not Nishant Pitti
कंगना रणौत रिलेशनशिपमध्ये, स्वतःच दिली कबुली; निशांत पिट्टीसह डेटिंगच्या चर्चांबद्दल म्हणाली…
Alyy Khan Kajol kissing scene
“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

अलीकडेच विकीने द इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘टायगर ३’मधील कतरिनाच्या टॉवेल फाइट सीनवर मौन सोडले आहे. विकी म्हणाला , “मी ‘टायगर ३ च्या स्क्रीनिंगला गेलो होतो आणि आम्ही चित्रपट पाहत होतो. जेव्हा मी चित्रपटातील कतरिनाचा टॉवेल फाइट सीन बघितला. तेव्हा मी तिला म्हणालो की, आजपासून मी तुझ्याबरोबर कोणतंच भांडण करणार नाही. कारण- तू मला अशा प्रकारे मारावं अशी माझी बिलकूल इच्छा नाही. मला वाटलं ज्या प्रकारे तिनं हा सीन शूट केला तो खरंच अविश्वसनीय आहे. कतरिना बॉलीवूडमधील सगळ्यात मोठी अॅक्शन अभिनेत्री आहे. मला तिच्या कामाचा, मेहनतीचा गर्व आहे. तिचं व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.”

‘टायगर ३’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४४.५० कोटींची कमाई केली होती. मात्र, दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घट होताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या १७ व्या दिवशी या चित्रपटाने केवळ २.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने २७६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा-“मी रणबीरच्या पाया पडून…” ‘अ‍ॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केले अभिनेत्याच्या कामाचे कौतुक

विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा ‘सॅम बहादूर’ चित्रपट १ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकीने भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारली आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्याच दिवशी रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘अॅनिमल’ व ‘सॅम बहादूर’ चित्रपटांची टक्कर बघायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Katrina kaif husband vicky kaushal on actress towel fight scene in tiger 3 dpj

First published on: 29-11-2023 at 12:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×