बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘फोन भूत’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासह अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका आहेत. सध्या कतरिना या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान दिलेल्या एका मुलखतीत कतरिनाने तिच्या चित्रपटासह खासगी आयुष्याबाबतही बरेच खुलासे केले. यावेळी तिने विकी कौशल तिला कोणत्या नावाने हाक मारते याचाही खुलासा केला.

कतरिना कैफ सध्या तिच्या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. चित्रपट हिट होण्यासाठी ती शक्य ते सर्व प्रयत्न करत असून इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची तिला चांगलीच साथ मिळत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरिनाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल आणि पती विकी कौशलच्या स्वभावाबद्दल भाष्य केलं. कतरिनाची ही मुलाखत सध्या बरीच चर्चेत आहे.

आणखी वाचा- कतरिना कैफने केले वैवाहिक जीवनावर भाष्य; म्हणाली, “म्हणून मला विकीबरोबर…”

‘फिल्म कम्पॅनियन’शी बोलताना कतरिना म्हणाली, “आम्ही दोघंही एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहोत. एकीकडे विकी खूपच शांत स्वभावाचा आहे. तर दुसरीकडे मी खूप घाईत राहणारी आणि लवकर राग येतो अशी व्यकी आहे. मला खूप लवकर राग येतो. माझ्या याच सवयीमुळे विकीने मला त्याचं पॅनिक बटन असं नाव दिलं आहे. अर्थात आम्ही दोघंही एकमेकांच्या कोणत्याही गोष्टी फारशा मनाला लावून घेत नाही. एकमेकांसह मस्ती करतो. एकत्र फिरायला जातो आणि एकमेकांना समजून घेतो.”

आणखी वाचा- “विकी माझ्यापासून लांब…” लग्नानंतर प्रथमच कतरिना कैफने व्यक्त केली खंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कतरिना कैफचा ‘फोन भूत’ हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हॉरर कॉमेडी अशा या चित्रपटात कतरिनासह सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय कतरिना लवकरच अभिनेता सलमान खानच्या ‘टायगर ३’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटाची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा आहे.