बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमानचा ‘टायगर ३’चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नुकतचं टायगर ३ मधला कतरिनाचा लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे.
हेही वाचा- “माझ्यावर स्वत:च्या मुलीप्रमाणे…” जिनिलीया देशमुखची सासूबाईंसाठी खास पोस्ट, म्हणाली “माझी मराठी…”
सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘टायगर ३’ मधील करितनाचा लूकचा फोटो शेअर केला आहे. सलमानने शेअर केलेल्या फोटोत कतरिनाने एका हातात दोरखंड आणि दुसऱ्या हातात बंदूक पकडलेल्या लुकमधला फोटो पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत सलमानने चित्रपटाच्या ट्रेलरबाबतही माहिती दिली आहे. टायगर ३ चा ट्रेलर १६ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सलमानच्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. अनेकांनी कमेंट करत ‘टायगर ३’ लवकरात लवकर प्रदर्शित करण्याची मागणी केली आहे.
‘टायगर ३’ बद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. आदित्य चोप्राने यशराज फिल्म्स अंतर्गत याची निर्मिती केली आहे. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’,’ वॉर आणि ‘पठाण’ या चित्रपटांचाही यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्समध्य समावेश आहे. ‘टायगर ३’ मध्ये सलमान आणि कतरिना व्यतिरिक्त इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
हेही वाचा- ‘मोदी भक्त’ म्हणून खिल्ली उडवणाऱ्या ट्रॉलर्सना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; म्हणाला, “ते फक्त…”
टायगर ३’ हा ‘एक था टायगर’ सीरिजमधील तिसरा भाग आहे. याचा सीक्वल म्हणजेच ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘टायगर ३’ आता यश राज फिल्म्सच्या ‘स्पाय युनिव्हर्स’चा भाग झाला आहे. येत्या दिवाळीत म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.