सध्या कतरिना कैफ तिच्या आगामी ‘फोन भूत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने आपल्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले. इतकंच नव्हे तर विकी कौशलबाबतही ती भरभरून बोलत होती. कतरिनाने यावेळी विकी आणि तिच्या लग्नाबाबतही सांगितलं. कतरिना-विकीचं लग्न सुरु असताना चक्क भांडणं झालं होतं.

आणखी वाचा – “दोन वेळा आत्महत्या करण्याचा…” समीर चौगुलेंना चाहतीने भर कार्यक्रमामध्ये दिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

कतरिना-विकीच्या लग्नात कोणाचं झालं भांडण?
कतरिना तुमच्या लग्नामध्येही बूट लपवण्याचा कार्यक्रम झाला का? तुझ्या तर बहिणीही खूप आहेत. तर विकी त्याचे बूट इतरांपासून लांब ठेवू शकला का? या प्रश्नांना उत्तर देत ती म्हणाली, “आमच्या लग्नामध्ये एक भांडण झालं होतं. मला खूप जोर जोरात भांडणांचा आवाज येत होता. लग्न सुरु असतानाच माझ्या पाठी खूप जोरात आवाज आला म्हणून मी मागे वळून पाहिलं.”

“मी जेव्हा मागे वळून पाहिलं तेव्हा विकीचे मित्र आणि माझ्या बहिणी मिळून भांडत आहेत असं मला दिसलं. आणि प्रत्यक्षात ते भांडत होते.” म्हणजेच इतर सामान्य लोकांप्रमाणेच विकी-कतरिनाच्या शाही विवाहसोहळ्यात असलेल्या दोन गटांमध्ये जबरदस्त भांडण झालं होतं.

आणखी वाचा – Video : आधी मांडीवर बसली, त्याने घट्ट मिठी मारली अन्…; ‘बिग बॉस’च्या घरात गौतम-सौंदर्याचा उघडपणे रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कतरिनाचा हा किस्सा ऐकून अर्चना पुरण सिंह यांनी विचारलं की, “अखेर जिंकलं कोण?” यावेळी ती म्हणाली, “मला याबाबत काही माहितच नाही. मी विचारलंच नाही.” कारण कतरिना तिच्या लग्नामध्येच व्यग्र होती. जयपूरमध्ये विकी-कतरिनाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला होता.